लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (पारशिवनी) : रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ हा कोळसा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. घटनास्थळाजवळ वजन मापेही आढळून आली आहेत.पेट्रोल पंपाजवळ दररोज दोन तीन ट्रक भरले आणि उतरवले जातात. जवळच असलेली कोळशाची खाण सुरू झाली तेव्हापासून हा अवैद्य कोळसा विकला जात असल्याचे यावेळी लोकांनी सांगितले. ट्रकचालक ही गाडी महानिर्मितीची असल्याचे सांगत होता.पालकमंत्र्यांनी पारशिवनी पोलिसांना बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून ट्रकसह कोळसा जप्त करून चालकाला अटक करण्याचे निर्देश दिले. घटनास्थळी यावेळी पालकमंत्र्यांसोबत रामटेकचे आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ. आशिष जयस्वाल, योगेश वाडीभस्मे व अन्य उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळशाचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 9:39 PM
रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ हा कोळसा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. घटनास्थळाजवळ वजन मापेही आढळून आली आहेत.
ठळक मुद्देनायकुंड येथे केली कारवाई