लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सोबतच ५० हजार रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला. आसीनगर झोनमध्येच पिवळ्या नदीच्या पात्रात अनधिकृत पद्धतीने बनवण्यात आलेल्या १८ झोपड्याही हटवण्यात आल्या.नारी घाटाच्या जागेवरील अतिक्रमणाचे प्रकरणही समोर आले आहे. घाटातील जागेवर एका व्यापाऱ्याने पाईप व केबल जमा करून कब्जा करून ठेवला आहे. संबंधित पाईप व केबल जप्त करण्यात आले आहे. नेहरुनगरातील दानिश लॉनचे अवैध शेड हटवण्यात आले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत साहित्यही जप्त करण्याचे आदेश दिले. मागील काही दिवसापासून महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाईची गती वाढवली आहे. धरमपेठ, नेहरुनगर, आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये कारवाई वाढवण्यात आली आहे.नाल्यावर स्लॅब टाकून बनवले गोदाम, स्टोर रुमनेहरुनगर झोन अंतर्गत दर्शन कॉलनीतील नाल्यावर स्लॅब टाकून गोदाम, स्टोअर रुम, स्वच्छतागृह बनवण्यात आले होते. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार हे अतिक्रमण हटवण्यात आले. सोबतच नाल्यावरील अवैध स्लॅबही हटवण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत लिंक रोडवर जवळपास तीन हजार वर्गफुटाच्या जागेवर अनधिकृत गॅरेज तयार करण्यात आले होते. हे गॅरेजही हटवण्यात आले. जरीपटका येथील नागरिकांच्या उपयोगाच्या जागेवर बनवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटचे गोदामही सील करण्यात आले. झोनमधील एक जीर्ण इमारतही पाडण्यात आली.
नागपुरातील दारु कंपनीचे अवैध बांधकाम तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:28 PM
मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्दे५० हजाराचा दंडही ठोठावला : पिवळ्या नदीच्या पात्रातील १८ झोपड्या तोडल्या