कामठी : विनापरवाना अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या एका आराेपीला कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडूून विदेशी कंपनीच्या ६० दारूच्या बाटल्या असा एकूण १४,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहरातील हरदासनगर येथे मंगळवारी (दि.७) दुपारी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुमित विकास गजभिये (२६, रा.हरदासनगर, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पाेळ्याच्या पाडव्याला सर्वत्र दारूबंदी असताना, आराेपी हा अवैधरीत्या दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच, पाेलीस पथकाने त्याच्या घरी धाड टाकली. त्यात आराेपीकडे विदेशी कंपनीच्या ६० दारूच्या बाटल्या आढळून आला. १४,४४० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करून पाेलिसांनी आराेपीला अटक केली. या प्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपीविरुद्ध कलम ६५ मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार संजय गीते करीत आहेत.