वाडी : नागपूर शहर पाेलीस उपायुक्त परिमंडळ-१च्या विशेष पथकाने वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना येथे कारवाई करीत देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून एकूण ३,१४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १७) सायंकाळी करण्यात आली.
घनश्याम गाेरखनाथ मलवे (रा. वडधामना, ता. नागपूर ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नागपूर शहर पाेलीस उपायुक्त परिमंडळ-१चे विशेष पथक वाडी परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना वडधामना येथे अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी गावात चाैकशी करून एका सभागृहासमाेरील माेकळ्या जागेची पाहणी केली. तिथे त्यांना घनश्याम दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी घनश्यामला ताब्यात घेत अटक केली आणि त्याच्याकडून ३,१४८ रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक जायभाये व सुनील मस्के करीत आहेत.