लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून कारवाई करीत असताना महिलेसह तिच्या दिराने महिला पाेलीस कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यात पाेलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्यात पती, पत्नीस अटक केली आहे. शिवाय, त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची ५०० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. धक्कबुक्की करण्याचा हा प्रकार खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथे साेमवारी (दि. २९) दुपारी घडला.
आराेपींमध्ये विक्की देवीदास चंद्रिकापुरे (३२) व गाैतम चंद्रिकापुरे (२८) या दाेघांसह महिलेचा समावेश आहे. यातील विक्की व त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. प्रीती बलदेव अहीरकर (३०) या खापरखेडा पाेलीस ठाण्यात शिपाईपदी कार्यरत आहेत. त्या साेमवारी दुपारी ठाण्यात असताना त्यांना विक्की चंद्रिकापुरे अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी दाेन सहकाऱ्यांना साेबत घेऊन लगेच त्याच्या घरी धाड टाकली. त्या पंचनामा करीत असताना विक्कीच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तिने स्वत:च स्वत:च्या अंगावरील कपडे फाडायला सुरुवात केली. त्यामुळे प्रीती अहीरकर यांनी त्यांना असला प्रकार करण्यास मज्जाव केला. मात्र, ती प्रीती यांच्या अंगावर धावून आली. शिवाय, गाैतमने त्यांचा हात पकडून त्यांना फरफटत नेले. प्रतिकार केला असता गाैतमने त्यांच्या गणवेशावरील लाईनयार्ड, नेमप्लेट ताेडली व ताेंडाचा मास्क ओढला.
नंतर पाेलिसांनी विक्कीच्याच घरातून ५०० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. ती दारू माेठ्या रबरी ट्यूबमध्ये भरली हाेती. त्या दारूची किंमत ५० हजार रुपये असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३५३, ३५४, ३३२, २९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून दाेघांना अटक केली. तिसऱ्या आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याच आराेपींनी पाेलीस कर्मचारी सूर्यभान जळते यांनाही धक्काबुक्की केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज मेश्राम करीत आहेत.