लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारू विक्रीला मनाई असताना अवैध दारू विक्री करणाऱ्या एका ढाबा मालकाला परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकातील पोलिसांनी रंगेहात पकडले. राजपालसिंग अमरिकसिंग बामरा (वय ४९) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली.लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासून सर्वत्र दारू विक्रीला मनाई करण्यात आली होती. मात्र, विविध भागात अवैध दारू विक्रेते लपून छपून दारू विक्री करीत होते. जरीपटक्यातील कामठी मार्गावर राजू ढाब्याच्या समोरच्या टिनाच्या शेडमध्ये एक व्यक्ती अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती परिमंडळ पाचमधील विशेष पोलीस पथकाला कळली. त्यावरून पोलीस पथकाने राजू ढाब्यावर छापा घातला. यावेळी तेथे ढाबा मालक बामरा विदेशी दारूची विक्री करताना रंगेहात सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी २९,८८२ रुपयांची रम आणि व्हिस्की जप्त केली. त्याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, नायक राजकुमार जनबंधू, पंकज लांडे, दिनेश यादव, विनोद सोनटक्के आणि मृदूल नगरे यांनी ही कामगिरी बजावली.
नागपूरच्या जरीपटक्यातील ढाब्यावर अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:35 PM
दारू विक्रीला मनाई असताना अवैध दारू विक्री करणाऱ्या एका ढाबा मालकाला परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकातील पोलिसांनी रंगेहात पकडले. राजपालसिंग अमरिकसिंग बामरा (वय ४९) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली.
ठळक मुद्देढाबा मालकाला अटक : परिमंडळ पाच पथकाची कारवाई