लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमेश्वर एमआयडीसी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून कार, चार माेटरसायकली आणि दारू असा एकूण १ लाख ९२ हजार ८१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२) करण्यात आली.
गणेश कैलास बावणे (२६, रा. लिंगा, ता. कळमेश्वर), महावीर नत्थू मेव्हणे (५३, रा. खापरी-काेठे, ता. कळमेश्वर), सुरेंद्र रूपसिंग ठाकूर, रा. कळमेश्वर, शुभम नारायण युवनाते, रा. काेतवाल बर्डी, ता. काटाेल व राेशन संभाजी खेडीकर (२९, रा. आदासा, ता. कळमेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळमेश्वर परिसरात गस्तीवर असताना त्यांना या भागातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी कळमेश्वर एमआयडीसी परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
यात त्यांना एका कारसह व चार माेटरसायकलींची देशी व विदेशी दारूची चाेरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या वाहनांमधील पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून वाहनांसह दारू जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किमत १ लाख ९५ हजार ८१० रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.