शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नागपुरातील यूओटीसीच्या जमिनीवर उगवले अवैध पैशाचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:35 AM

शासनाकडून झालेला न्यायनिवाडा अमान्य करीत जमिनीवर मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या एकाला पॉवर आॅफ अटर्नी (आममुख्त्यारपत्र) करून दिले. अन् तेव्हापासून नक्षलविरोधी अभियान-अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या जमिनीवर पैशाचे झाड उगवू लागले.

ठळक मुद्देन्यायनिवाडा अमान्यआममुख्त्यारपत्राची कमाल अनेक बिल्डर, लॅण्ड डेव्हलपर्सकडे विचारणा

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाकडून झालेला न्यायनिवाडा अमान्य करीत जमिनीवर मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या एकाला पॉवर आॅफ अटर्नी (आममुख्त्यारपत्र) करून दिले. अन् तेव्हापासून नक्षलविरोधी अभियान-अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या जमिनीवर पैशाचे झाड उगवू लागले. मंगळवारी या जमिनीच्या बनावट खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकमतने या प्रकरणाचे मूळ तपासले असता धक्कादायक माहिती पुढे आली.सुराबर्डीतील ही ४.२६ हेक्टर (सुमारे १०.५२ एकर) जमीन आजच्या घडीला भूखंड पाडून विकल्यास २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची आहे. १९११ ला ब्रिटिश राजवटीत ती मालगुजाराकडे होती. १९९५ ला या जमिनीचा न्यायनिवडा झाला. त्यानुसार ती शासनाच्या मालकीची झाली. तेव्हापासून या जमिनीच्या बाजूला नक्षलविरोधी अभियान-अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र (एएनओ-यूओटीसी)च्या निर्मितीची हालचाल सुरू झाली होती. दरम्यान, या जमिनीवर मालकी हक्क सांगणारे समर्थ नामक व्यक्ती यांनी शासनाचा १९९५ चा न्यायनिवाडा अमान्य केला. त्यानंतर त्यांनी या जमिनीसंबंधीच्या व्यवहाराचे आममुख्त्यारपत्र समर्थ यांनी कृष्णा खानोरकर यांच्या नावे करून दिले. तेव्हापासून या जमिनीवर पैशाचे झाड उगवू लागले. अनेक दलालांच्या माध्यमातून अनेक बिल्डर, लॅण्ड डेव्हलपर्स आणि प्रॉपर्टी डीलरकडे या जमिनीच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे पोहोचली. त्यांच्याकडे ही जमीन विकत घेण्यासंबंधी चर्चाही झाली. मात्र, नक्षलविरोधी अभियाना(एएनओ)ची येथे निर्मिती होणार असल्याचे कळाल्याने, हा धोक्याचा सौदा करण्याची हिंमत कुणी दाखविली नाही. सुराबर्डी इस्टेट प्रा. लि.चे ब्रिजकिशोर हरगोविंद अग्रवाल यांनी मात्र खानोरकर यांच्याशी सौदा करून ही जमीन विकत घेण्याची तयारी दाखविली.

सुरू झाली बनवाबनवीअग्रवाल यांनी टोकन दिल्यानंतर कागदोपत्री बनवाबनवीला वेग आला. सूत्रांच्या माहितीनुसार, ३५ लाखांत (आॅन रेकॉर्ड) या जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार दाखविण्यात आला. त्यात कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून खानोरकर-अग्रवालच्या जोडगोळीने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून २००८ ला तत्कालीन तलाठी प्रकाश बोरकर, तत्कालीन मंडल अधिकारी दीपक मावळे यांना हातशी धरले. लाखोंचा मलिदा मिळणार म्हणून या दोघांनी खोटे बंधपत्र, शपथपत्र, प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी मदत केली. महसूल विभागातील अन्य काही अधिकाऱ्यांनीही पडद्यामागून या बनवाबनवीला हातभार लावला. त्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे तयार झाली अन् एकदाचा या जमिनीचा विक्री व्यवहार पार पडला.

यांना कुणी मॅनेज केले?जमिनीसंबंधीची बनावट कागदपत्रे तयार करण्यात महसूल विभागातील शुक्राचार्यांनी मदत केली. त्यासाठी त्यांनी दलालाच्या माध्यमातून लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून बघितल्या जाणाऱ्या नक्षलविरोधी अभियान (एएनओ) आणि अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे (यूओटीसी) तत्कालीन प्राचार्य शेषराव भगत तसेच तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास जगताप यांना कुणी आणि कसे मॅनेज केले, ते कळायला मार्ग नाही. त्यांनी त्यासाठी किती मलिदा घेतला अन् त्याबदल्यात आपल्याच विभागाच्या कागदपत्रात जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भाने खोट्या नोंदी कशा केल्या, त्याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. हा मुद्दा आता स्वतंत्र चौकशीचा भाग ठरला आहे.

जमीन जैसे थे!या जमिनीची १० वर्षांपूर्वी खरेदी-विक्री झाली अन् बनावट मालकी हक्कही मिळाला असला तरी त्या जमिनीची स्थिती जैसे थेच आहे. अर्थात या जमिनीवर भूखंड पाडून विकल्यास किमान २०० कोटी रुपयांची ही जमीन आहे. मात्र, जमिनीवर जाण्यासाठी यूओटीसीच्या गेटमधूनच जायला मार्ग आहे. त्यामुळे तेथे लेआऊट टाकणे किंवा भूखंड विकणे काही शक्य झाले नाही अन् अखेर जमिनीची खरेदी-विक्री करून त्यासाठी लाखो रुपये खर्ची घालणाऱ्या अग्रवालसह अन्य आरोपींवरही मंगळवारी गुन्हे दाखल झाले. तूर्त या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा