लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे, त्याच्या मुलगा रजत आणि दोन साथीदारांविरुद्ध पुन्हा एक खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे.सागर विजय देशमुख (वय २१) हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. रामनगर येथील शिव मंदिर जवळ राहणारे देशमुख किराणा दुकान चालवितात. त्यांना व्यवसायासाठी पैशाची निकड असल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर २०१९ ला आरोपी फातोडेकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. पैसे देताना आरोपींनी देशमुख यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या. त्यांचे आधार कार्ड, दोन फोटो आणि पावती बुकावर सह्या घेतल्या. १५ हजाराच्या बदल्यात २० हजार रुपये जबरदस्तीने वसूल करूनही पुन्हा पैसे मिळावे म्हणून आरोपी त्यांना वारंवार धमक्या देऊ लागले. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्यामुळे देशमुख यांनी गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली.विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाने फातोडे, त्याचा मुलगा रजत या दोघांविरुद्ध सलून व्यावसायिकाकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्याची खुर्ची आणि सोफे उचलून नेले होते. हा गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने संजय आणि रजत फातोडे या दोघांना अटक केली. सध्या ते कस्टडीत आहे. गुरुवारी संजय फातोडे, रजत फातोडे आणि साथीदार प्रफुल ऊर्फ दादू गायकवाड तसेच एक अनोळखी आरोपी अशा चौघांविरुद्ध अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुन्हा होणार गुन्हे दाखलसंजय फातोडे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या नावाखाली त्याने अनेकांच्या जमिनी आणि मालमत्ता हडपल्या आहेत. तो अवैध सावकारी करतो. त्याने अनेकांची पिळवणूक केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
अवैध सावकारी : नागपुरातील कुख्यात फातोडे बापलेकावर पुन्हा एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 8:48 PM
कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे, त्याच्या मुलगा रजत आणि दोन साथीदारांविरुद्ध पुन्हा एक खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्दे जीवे मारण्याची धमकी