शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

मागासवर्गीयांकडून अवैध शुल्क वसुली

By admin | Published: July 25, 2016 2:20 AM

शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करूनये असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी जारी केले आहेत.

शासन निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता : महाविद्यालयांवर वचक कुणाचा ? योगेश पांडे नागपूर शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करूनये असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी जारी केले आहेत. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील काही संलग्नित महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शुल्क घेण्यात येत आहेत. सामाजिक न्याय खात्याकडेदेखील यासंदर्भात तक्रारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करू नये, असे निर्देश २१ एप्रिल १९८७ रोजी उच्च न्यायालयाने दिले होते. समाज कल्याण विभागानेदेखील यासंदर्भात २००३ साली परिपत्रक काढले होते. राज्य शासनाकडून वारंवार यासंदर्भात सूचना देण्यात येतात. नागपूर विद्यापीठात सध्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या निर्देशावरून प्रशासनाने पत्र जारी केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांत प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या शुल्काची प्रतिपूर्ती केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीद्वारे करण्यात येते. परंतु काही महाविद्यालयांत प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क भरायला लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नियमांवर बोट ठेवले तर त्यांना आपल्या सोईच्या अटी सांगण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शुल्क परत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येत आहे.