लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद येथे हायकोर्टाच्या आदेशानंतर ग्राहकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणाºया मॉलविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे नोंदविले आहेत. या संदर्भात नागपुरातील मॉलची पाहणी केली असता बहुतांश मॉलमध्ये ग्राहकांकडून मनमानी शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे तथ्य समोर आले.एवढेच नव्हे तर मॉलच्या संचालकांनी सार्वजनिक जागेत ग्राहकांना नि:शुल्क पार्किंग उपलब्ध करून देण्याऐवजी शुल्क वसुली सुरू केली आहे. पार्किंग वसुली करणारे कर्मचारी ग्राहकांसोबत नेहमीच हुज्जत घालतात. त्यामुळे अनेकदा नागरिक आणि पार्किंगच्या कर्मचाºयांमध्ये वाद होतो. दुसरीकडे ग्राहकाने काही मिनिटांसाठी मॉलबाहेर वाहन ठेवल्यास त्यांना वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागते.बहुमजली इमारतीत येणाºया ग्राहकांना नि:शुल्क पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदार असलेले मॉल व्यवस्थापक याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. बहुमजली इमारतीत आवश्यक पार्किंग जागा सोडण्याच्या अटीवर नकाशा मंजूर करणारे मनपा प्रशासन आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणाºया वाहतूक विभागाने या प्रकरणी चुप्पी साधली आहे.मॉलसमोरच पे अॅण्ड पार्कचा बोर्डबाबू अहमद यांनी सांगितले की, इंदोरा येथील जसवंत मॉलमध्ये चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्यासाठी आलेल्या पे्रक्षकांनी मॉलसमोर वाहन ठेवताच त्यांच्या हातात २० रुपयांची रसीद दिली जाते. मॉलच्या पायºयासमोरच पे अॅण्ड पार्कचा बोर्ड लावला आहे. यामुळे अनेकदा ग्राहकांचा पार्किंग कंत्राटदारांच्या लोकांसोबत वाद होतो.ग्राहकांना मिळते नि:शुल्क पार्किंग सुविधाएकीकडे अधिकांश मॉलमध्ये पार्किंगच्या माध्यमातून नागरिकांकडून जबरीने पैसे वसुली सुरू आहे तर दुसरीकडे रामदासपेठ येथील लँडमार्क मॉलमध्ये ग्राहकांसाठी नि:शुल्क पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच सिव्हील लाईन्स येथील पॅन्टालून मॉलमध्ये नि:शुल्क पार्किंग व्यवस्थेत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे समाधान होत आहे.अनेकदा वादविवादाची स्थितीझाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात दुकानदारांच्या ग्राहकांकडूनही पार्किंग शुल्क वसूल केले जाते. सार्वजनिक इमारत असूनही दुचाकी वाहनांकडून १० रुपये पार्किंग शुल्क घेण्यात येते, अशी नागरिकांची तक्रार आहे. येथे पार्किंगचा ठेकेदार आणि त्याचे कर्मचारी टेबल टाकून पावतीबुक घेऊन बसतात. बिल्डर दुकानदारांकडून मेन्टेनन्स घेऊनही पार्किंगची वसुली करणारे बसवित आहे.मनमानी शुल्क वसुलीएम्प्रेस मॉलमधील ग्राहक राजेश मारचट्टीवार यांच्यानुसार शहराच्या वेगवेगळ्या मॉलमध्ये पार्किंग ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे शुल्क वसूल करतात. वर्धमाननगरच्या आयनॉक्समध्ये दुचाकी पार्किंगचे शुल्क १० रुपये घेण्यात येते तर एम्प्रेस मॉल, सेंट्रल आणि इटर्निटी मॉलमध्ये दुचाकी वाहनाच्या पार्किंगचे शुल्क २० रुपये वसुल करण्यात येते. एम्प्रेस मॉलच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये नेहमीच पाणी साचलेले असते. पार्किंग शुल्काच्या पावतीवर गाडीचे पार्ट चोरीला गेल्यास जबाबदारी नसल्याचा उल्लेख असतो.हैदराबादच्या धर्तीवर नागपुरात व्हावी कारवाईअखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ अध्यक्ष गजानन पांडे यांच्या मते, अनेकदा हे मुद्दे उचलण्यात आले आहेत. शहरातील कोणत्याही खासगी मॉल, कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, रुग्णालयांना पार्किंग शुल्क वसल्ूा करण्याचा अधिकार नाही. तेथे नागरिक फिरण्यासाठी नाही तर खरेदी, शासकीय कामकाज, उपचारासाठी जातात. त्यासाठी कोणत्या ना कोणत्या रुपाने संबंधित प्रशासन आणि व्यवस्थापनाला शुल्क अदा करतात. त्यासाठी नागरिक आणि ग्राहकांच्या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची असली पाहिजे. अतिरिक्त पार्किंग शुल्क नियमात बसणारे नाही. यासोबतच महापालिका आणि नासुप्रने पार्किगसाठी उपलब्ध जमीन व्यावसायिकांना दिली आहे. उड्डाण पुलाच्या खाली पार्किंग झोन तयार करून शुल्क आकारणे चुकीचे आहे. उलट त्यांच्या जमिनीवर पार्किंग प्लाझा तयार करून नागरिकांना नाममात्र शुल्कात पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.
मॉलकडून पार्किंग शुल्काची अवैध वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:39 AM
हैदराबाद येथे हायकोर्टाच्या आदेशानंतर ग्राहकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणाºया मॉलविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे नोंदविले आहेत.
ठळक मुद्देबाहेर वाहन पार्किंगवर वाहतूक विभागाची कारवाई : अनधिकृत स्टँडच्या कर्मचाºयांची नागरिकांसोबत हुज्जत