अमरावती : गल्लीबोळात अवैध कत्तलखाने आणि उघड्यावर मांस विक्रीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार उघडपणे सुरू असताना मांस विक्रीकरिता अन्न व औषधी प्रशासनाने दिलेल्या परवान्यामुळे महापालिका हतबल झाली आहे. तर दुसरीकडे अप्रमाणित आणि आजारी जनावरांची कत्तल होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मांस विक्री आणि कत्तलखान्याविषयी मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत. जनतेचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही अपेक्षित आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात जनावरांची होणारी कत्तल आणि मांसविक्री अवैधरीत्या सुरू आहे. साडेआठ लाख लोकसंख्या असलेल्या महानगरात न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये, ही खेदजनक बाब आहे. शहरातील मुस्लिम बहूल भागात जमील कॉलनी, आझादनगर, ताजनगर, नूरनगर तसेच बडनेरा येथील कुरैशीनगर येथे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोकयात आले आहे. कत्तलीनंतर निघणारे जनावरांचे रक्त, सांडपाणी आणि टाकाऊ मांस नाल्यात फेकले जाते. त्यामुळे नाल्याच्या काठालगत राहणाºया नागरिकांना अनेक असाध्य रोगांनी ग्रासले आहे. मुस्लिम बहुल भागात मोठया प्रमाणात जागोजागी मांस विक्री केली जाते. तसेच रहाटगाव, पंचवटी चौक, सातुर्णा, गाडगेनगर, महाजनपुरा, बियाणी चौक, वडाळी परिसर, साईनगर, रवीनगर, मायानगर, यशोदानगर, बेलपुरा, विलासनगर, लक्ष्मीनगर, दस्तुरनगर, चपराशीपुरा, टोपेनगर, कठोरा नाका, बडनेºयातील जुनिवस्ती व नविवस्ती येथे बकºयांची कत्तल करून मांस विक्री केली जाते. हे मांस खाणायोग्य आहे किंवा नाही, हे तपासणारी यंत्रणा नसल्याने विके्रते मनात येईल त्या बकºयांची कत्तल करून मांस विकत असल्याची माहिती आहे. हे अप्रमाणित मांस आणि त्या मांसाच्या वेस्टेजचे अनेक अनिष्ट परिणाम समोर येत असले तरी त्यावर अंकुश लावणारी यंत्रणा नसल्याचे दिसते. याबाबत विचार व्हायला हवा. (प्रतिनिधी)
गल्लीबोळात अवैध कत्तलखाने
By admin | Published: May 05, 2014 12:16 AM