लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेच्या इतिहासात तब्बल पाच दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेचा समारोप अखेर शुक्रवारी झाला. स्थगन प्रस्तावावरील चार दिवसाच्या चर्चेत सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. आयुक्त लबाड आहेत. ते खोटं बोलतात स्वत:ची पाठ थोपटून घेतात अशी घणाघाती टीका केली. आयुक्तांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप तितक्याच ठामपणे नाकारले. मी लबाड नाही, खोटं बोलत नाही. वस्तुस्थितीवर बोलतो. कोविड-१९ नियंत्रणासाठी उपाययोजना करताना लोकांचे जीव वाचावे म्हणून निर्णय घेतले. मनपाच्या तिजोरीत जुनी देणी देण्यासाठीच पैसे नसल्याने वर्कऑर्डर झालेली कामे सुरू करता येणार नाही, अशी ठाम भूमिका मुंढे यांनी मांडली.केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिदेंशानुसार प्रतिबंधित क्षेत्राची घोषणा व क्वारंटाईन सेंटर सुरू केले. आज शहरात ९६ कन्टेन्मेंट झोन आहेत. ११ मार्चला नागपूर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला त्यावेळी कोविड-१९ सर्वांसाठी नवीन होता. वेळोवेळी गाईड लाईन बदलत गेल्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने निर्णय घेतले. प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सुविधा सुरु होत्या. ११ मार्चला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर घरोघरी सर्वे सुरू करण्यात आला. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. क्वारंटाईन सेंटवर जेवण व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. जेवणासंदर्भात आलेल्या तक्रारींची वेळोवेळी दखल घेण्यात आली. राधास्वामी सत्संग येथून जेवण येत असून उत्तम दर्जाचे आहे. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार जेवण देणे शक्य नसल्याचे मुंढे यांनी सांगितले.सुरुवातीला क्वारंटाईन सेंटची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होती. त्यानंतर मनपाकडे आली. जेवणासाठी कंत्राटदार नेमले होते. प्रतिव्यक्ती १५९ दराने कंत्राट दिले. त्यानंतर राधास्वामी सत्संग मंडळाकडून मोफत जेवण मिळाले. आता फक्त पॅकिंग व चहा , बिस्कीट यावर मनपा खर्च करीत आहे.मनपाकडे पैसेच नसल्यामुळे वर्क ऑर्डरर्स थांबिवलेमनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. महापालिकेकडे २१२१ कोटींचे दायित्व आहे. १९१ कोटी आस्थापना तर ७४९ कोटी वैधानिक व शासकीय दायित्व आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताना जुने देणे असल्याने नवीन देणी निर्माण करू नका, असे विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत. जिथे निधी नाही तेथील कामांना वर्कऑर्डर दिलेले नाही. जुनी देणी देण्यासाठीच पैसे नसल्याने कार्यादेश झालेली कामे थांबविण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले.आयुक्त काय म्हणाले ?एसओपीच्या गाईडलाईननुसार लोकवस्तीत क्वारंटाईन सेंटरची निर्मिती.शहरातील प्रतिबंधित भागांना भेटी देऊन पाहणी केली.नागपूर शहरातील कोविड रुग्णांचा डेथ रेट अन्य शहरांच्या तुलनेत कमीशासनाच्या गाईडलाईननुसार राधास्वामी सत्संग येथे पोलीस केअर सेंटरची उभारणी.संसर्ग वाढल्याने सतरंजीपुरा मोमीनपुरा परिसर हॉटस्पॉट बनले.गर्दी होणार असल्याने दारू दुकानांना परवानगी नाकारली. त्यामुळेच चहा टपऱ्यांना परवानगी नाही.वॉररूम मधून कोरोना नियोजन. त्रुटीची मी जबाबदारी घेतो.शहरातील २३ लाख लोकांचा सर्वे नागपूर शहरात ९६ कन्टेन्मेंट झोनसमितीत चर्चा झाल्यानंतरच कोविड नियंत्रण संदर्भातील उपाययोजनाजेवणासंदर्भात तक्रार आल्यानंतर पुरवठादार बदलले प्रत्येक तक्रारींची दखल घेऊन चौकशी.क्वारंटाईन सेंटरमुळे शहरात संसर्ग वाढलेला नाही.
मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:12 PM
महापालिकेच्या इतिहासात तब्बल पाच दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेचा समारोप अखेर शुक्रवारी झाला. स्थगन प्रस्तावावरील चार दिवसाच्या चर्चेत सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. आयुक्त लबाड आहेत. ते खोटं बोलतात स्वत:ची पाठ थोपटून घेतात अशी घणाघाती टीका केली. आयुक्तांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप तितक्याच ठामपणे नाकारले. मी लबाड नाही, खोटं बोलत नाही. वस्तुस्थितीवर बोलतो.
ठळक मुद्देलोकांचा जीव वाचावा म्हणून निर्णय घेतले