लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी मंगळवारी दिले.महानगरपालिका शिक्षक संघातर्फे अध्यापक भवन येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षक दिन कार्यक्रमात बोलताना महापौरांनी हे निर्देश दिले. यामुळे निलंबित शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.महापालिके च्या शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न २० जानेवारीपर्यंत निकाली काढा, शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मुंबईला जाऊन तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नागो गाणार होते. व्यासपीठावर मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे, नगरसेविका हर्षला साबळे, अपर आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रमुख सचिव प्रमोद रेवतकर, मनपा शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी ८० गुणवंत विद्यार्थी, ३ आदर्श शिक्षक व ७५ सेवानिवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी नागो गाणार, गोपाल बोहरे, प्रीती मिश्रीकोटकर, शिक्षण संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी प्रास्ताविकातून महापालिकेतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व समस्या मांडल्या तसेच महापौरांना मागणीपत्र सादर केले.संचालन कृष्णा उजवणे व माला कामडे यांनी तर आभार शिक्षक संघाचे सचिव देवराव मांडवकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी मलविंदरकौर लांबा, आनंद नागदिवे, राकेश दुप्पलवार, तेंदुषा नाखले, दीपक सातपुते, अरविंद आवारी, गीता विष्णू, नूतन चोपडे, विनायक कुथे, मधुकर भोयर, विकास कामडी, परवीन सिद्दीकी, अशोक बालपांडे, कल्पना महल्ले, सुभाष उपासे, रामराव बावणे, प्रफुल्ल चरडे, नूरसत खालीद, काजी नुरुल लतील, सिंधू तागडे, मलका मुनीर अली, माया गेडाम, विनय बरडे, ज्योती खोब्रागडे, विजया ठाकरे, गजानन सेल्लोरे, मनोज बारसागडे, प्रकाश जिल्हारे आदींनी परिश्रम घेतले.
पाच शिक्षकांचे निलंबन तात्काळ मागे घ्या : महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 10:58 PM
उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले.
ठळक मुद्देअखिल भारतीय शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात