शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूर विमानतळावर पार्किंगचे अवाढव्य शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:39 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शुल्कात १ एप्रिलपासून १० टक्के वाढ केल्यामुळे वाहनचालकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त असून त्यांची ओरड सुरू आहे. वेगवेगळे वाहन आणि वेळेनुसार पार्किंगच्या शुल्कात १० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशात नागपूर विमानतळावर पार्किंग शुल्क सर्वाधिक असल्याचे वाहनचालकांचे मत आहे.

ठळक मुद्देदेशात सर्वाधिक असल्याची ओरड : १० ते २०० रुपयांपर्यंत वाढ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शुल्कात १ एप्रिलपासून १० टक्के वाढ केल्यामुळे वाहनचालकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त असून त्यांची ओरड सुरू आहे. वेगवेगळे वाहन आणि वेळेनुसार पार्किंगच्या शुल्कात १० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशात नागपूर विमानतळावर पार्किंग शुल्क सर्वाधिक असल्याचे वाहनचालकांचे मत आहे.सुरक्षेसाठी पार्किंगचे विभाजन, वेळेनुसार शुल्कविमानतळावर येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता विमानतळ प्रशासनाने पार्किंग यंत्रणेत बदल केले आहेत. विमानतळाच्या टर्मिनल परिसरात होणारी वाहनांची गर्दी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पार्किंग झोनला चार भागात विभाजित केले आहे. यामध्ये फ्री ड्रॉप एरिया, प्रीमियम पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप एरिया, जनरल पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप एरिया आणि जनरल पार्किंग एरियाचा समावेश आहे. टर्मिनल इमारतीसमोरील फ्री ड्रॉप एरियात वाहन पाच मिनिटांपर्यंत उभे राहू शकतात. पण पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास शुल्क आकारण्यात येते. पूर्वी दुचाकीसाठी ५० रुपये, कॅबसाठी पाच मिनिटांचे १०० रुपये आणि तीनचाकी वाहनांसाठी ७० रुपये आकारण्यात येत होते. आता त्यात वाढ करून दुचाकीसाठी ६० रुपये, कॅबसाठी १२० रुपये आणि तीनचाकीसाठी ९० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.याशिवाय टर्मिनल इमारतीच्या थोड्याच अंतरावर प्रीमियम पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप एरियामध्ये पूर्वी १५ मिनिटांसाठी कार आणि कॅबला ३०० रुपये पार्किंग शुल्क लागायचे. त्यात वाढ होऊन आता ३६० रुपये आणि एलसीव्ही मिनीबसचे पार्किंग शुल्क एक हजारावरून १२०० रुपयांपर्यंत वाढविले आहे. त्यानंतरच्या प्रत्येक १५ मिनिटांसाठी तेवढेच शुल्क आकारण्यात येत आहे.मासिक पासचे शुल्क वाढलेकंत्राटदारातर्फे झोन-३ करिता मासिक पास जारी करण्यात येते. पासच्या शुल्कात २५०० रुपयांवरून ३ हजारांपर्यंत वाढ झाली आहे. एलसीव्ही, मिनी बससाठी पूर्वी १३ हजार आता १५ हजार ६०० रुपये, दुचाकीसाठी पूर्वी एक हजार आता १२०० रुपये आणि तीनचाकी वाहनांसाठी १६०० रुपयांवरून १९२० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरParkingपार्किंग