वाडी : काेराेना संक्रमण आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी गणपती बाप्पांचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये करावे त्यासाठी नगर परिषदेने ठिकठिकाणी टॅंकची निर्मिती केली आहे, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली आहे.
भाविकांना बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक विहिरी, डिफेन्स तलाव अथवा इतरत्र करून नये. विसर्जन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. पालिका प्रशासनाने वाडी शहरातील शिवशक्तीनगर, व्ही. एल. कॉन्व्हेंट समोरील मैदान, गजानन सोसायटी क्रीडा मैदान, डॉ. आंबेडकर नगरातील मैदान, मंगलधाम सोसायटी क्रीडा मैदान, शाहू ले आऊटमधील मैदान, नवनीतनगरातील मैदान येथे कृत्रिम टॅंक तयार केल्या आहेत. या टॅंकच्या साफसफाईची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे, असेही जुम्मा प्यारेवाले यांनी सांगितले.
180921\img-20210916-wa0173.jpg
फोटो