लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ विषाणूचे संक्रमण लक्षात घेता, यंदाचे सर्वच उत्सव हे शासनाचे दिशानिर्देश आणि नियमांचे पालन करून साजरे करायचे आहेत. गणेशोत्सव हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असून सार्वजनिक गणेशोत्सव नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र यंदा प्रशासनाच्या आवाहनाची दखल घेत सर्वच मंडळे नियमाचे पालन करून उत्सव साजरा करीत आहेत. आता घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. आवश्यक असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळांनीसुद्धा तलावावर विसर्जन न करता मंडळाच्या जवळपास कृत्रिम तलावात किंवा तशी व्यवस्था करून विसर्जन करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.मनपाने यापूर्वीच कुठल्याही तलावावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान घरगुती गणेशाचे दीड दिवसापासून विसर्जन सुरू झाले. सार्वजनिक ठिकाणी, तलावावर गर्दी होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करा,असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. यापुढे पाचव्या, सातव्या अथवा दहाव्या दिवशीचे विसर्जन सर्व नागरिकांनी घरी किंवा सोसायटीत व्यवस्था करून करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.‘विसर्जन रथ’ येईल घरीमहापालिका मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवीत आहे. यासाठी झोननिहाय ‘विसर्जन रथा’ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक झोननिहाय संपर्क क्रमांकही उपलब्ध केले असून, त्यावर संपर्क साधल्यास ‘विसर्जन रथ’ घरी येईल. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.विसर्जन रथासाठी झोननिहाय संपर्क क्रमांकलक्ष्मीनगर झोन - सचिन लोखंडे ७६२०१८७१०१सुधीर अडकिने ७०५८५३६४२१धरमपेठ - दीनदयाल टेंभेकर, झोनल अधिकारी ९८२३२४५६७१हनुमाननगर - दिनेश कलोडे, झोनल अधिकारी ९८२३२४५६७३, नवीन मेश्राम ७०५७७३३२५५धंतोली - धर्मेंद्र पाटील, झोनल अधिकारी ७८७५५५१८८३ लांजेवार, ७५१७३६८६११नेहरूनगर - विठोबा रामटेके झोनल अधिकारी ९८२३३१३०६४, दहिवाले ९९६०७४०७६५, दिवाकर ९८२२९३८०१६.गांधीबाग - सुरेश खरे, झोनल अधिकारी ९६३७०७३९८७सतरंजीपुरा - प्रमोद आत्राम, झोनल अधिकारी ९८२३२४५६७९ नागपुरे ७०३०५७७६५०.लकडगंज - विनोद समर्थ ७७९८७३४३५५आशीनगर - किशोर बागडे, झोनल अधिकारी ९८२३३१३१०२ ,अमर शेंडे ९०२२५७१८४९ दूरध्वनी - ०७१२ - २६५५६०५मंगळवारी - महेश बोकारे, झोनल अधिकारी ९८२३२४५६७, रमेश देशमुख ७०६६२६२३५४ व नितीन गोरे ९८५०६६०५६६
बाप्पाचे घरीच करा विसर्जन! मनपाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:54 AM
घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. आवश्यक असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे.
ठळक मुद्दे‘विसर्जन आपल्या दारी’ व्यवस्थाही उपलब्ध