लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनीगणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर ६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात आले. तर मागील वर्षी २७६ कृत्रिम तलावात दोन लाख ३२ हजार ७०२ श्रीं चे विसर्जन करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाख २९ हजार ९२० गणपतींचे विसर्जन कमी झाले. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे व उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.विसर्जनासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली. निर्माल्य कलशामध्ये टाकण्याकरीता तसेच श्रीं चे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याकरीता स्थानिक सेवाभावी संस्थेच्या मदतीने व्यापक प्रचार करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागातील२२२ कर्मचारी व अधिकारी विसर्जनाकरीता कार्यरत होते.यात ५ नियंत्रण अधिकारी, १० स्वच्छता अधिकारी,५६ स्वास्थ निरीक्षक, १५१ जमादार यांचा समावेश होता. गोळा केलेले निर्माल्य वाहून नेण्याकरीता मे. ए.जी. इनव्हायरो आणि मे. बी.व्ही.जी. इंडिया. लि. या दोन्ही एजन्सीद्वारे २६२ कर्मचारी व ११० वाहने उपलब्ध करुन देण्यात आले होते.फुटाळा तलावावर व कृत्रिम तलावाच्या लगत निर्माल्य गोळा करण्याकरीता निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. गणपतीच्या विसर्जनाकरीता मनपाचे ५९० कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत होते.सेवाभावी संस्थांचा सहभागगणपती विसर्जनाकरीता स्थानिक सेवाभावी संस्था ग्रीन व्हिजील फाउंडेशन आणि मर्चंट नेव्ही ऑफीसर्स वेलफेअर असोसिएशनच्या स्वयंसेवकांकडूनहीसहकार्य मनपला मिळाले. नागरिकांच्या प्रतिसादामुळे यावर्षी श्री चे विसर्जन मोठया प्रमाणात घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावात करण्यात आले आहे.१८४ कृत्रिम तलावयावर्षी मनपातर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जनसाठी नागरिकांच्या सोयीसाठी सर्व झोन मध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. त्याकरीता फायबर टँक, जमिनीत खड्डे, सेंन्ट्रींगची टँक असे एकुण १८४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 8:22 PM
कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
ठळक मुद्दे६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात मनपाच्या आवाहनाला नागपूरकरानीं साथमोठया प्रमाणात श्रीं चे घरीच विसर्जन