शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 8:25 PM

भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

ठळक मुद्दे ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीत वाढ : कॅटची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले असून ते ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतींनी संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.भारतात ८ कोटींपेक्षा जास्त लहान व्यावसायिक आहेत. कोरोना महामारीमुळे १.५० कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांवर शोरूम वा दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातच मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या लोकांना जास्त सवलतीत वस्तू देत असल्याने त्याचेही संकट व्यापाऱ्यांवर आले आहे. ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव पाहता कॅटने व्यापाऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये ई-कॉमर्स पोर्टल भारत या ई-मार्केटला लॉन्च करण्याची तयारी केली आहे. याचा फायदा दुकानदारांना होणार आहे. कॅटने ई-कॉमर्स धोरणासह ई-कॉमर्स व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या अंतर्गत ई-कॉमर्स धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्याचे सुचविले आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना एफडीए धोरणात कोणतीही सूट देण्याची आवश्यकता नाही. एफडीए नियमांचे सक्तीने पालन करावे, असे बंधन या कंपन्यांवर टाकावे. ई-कॉमर्स पॉलिसी आली तर देशात सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा राहील.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, ई-कॉमर्स देशाचे भविष्य आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच नियमांचे पालन करण्यासाठी ई-कॉमर्स पॉलिसीची गरज आहे. कोरोना महामारीपूर्वी ई-कॉमर्सचा व्यवसाय ६ टक्के होता, तो सध्या २४ टक्क्यांवर गेला आहे. शहरी भागातील ४२ टक्के इंटरनेट उपयोगकर्ते आता ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करीत आहेत. अशा स्थितीतही देशातील दुकाने आपली भूमिका महत्त्वपूर्ण बजावत राहतील, पण त्यांना प्रोत्साहनपर धोरणांची गरज आहे. भारतात ई-कॉमर्स बाजार २०२६ पर्यंत २०० बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तो सध्या ४५ बिलियन डॉलर आहे. देशात इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे ६८७ दशलक्ष डिजिटल उपयोगकर्ते आहेत. त्यापैकी ७४ टक्के ई-कॉमर्स व्यवसायात सक्रिय आहेत. भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलbusinessव्यवसाय