लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची माहिती कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या इनलँड कंटेनर डेपो(आयसीडी)नागपूरचे महाव्यवस्थापक अनुप कुमार सत्पथी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.तीन कोटींची सौर ऊर्जेची उपकरणेसौर ऊर्जेची उपकरणे मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यालगत उभारण्यात येणाºया ७५० मेगावॅटच्या प्रकल्पात आणि अन्य दोन ठिकाणी खासगी वाहतूकदारांमार्फत रस्ते मार्गाने पाठविण्यात येणार आहे. उपकरणांची (४५ कंटेनर) किंमत जवळपास तीन कोटी रुपये आहे. सत्पथी म्हणाले, मुंबईच्या ९५० कि़मी.च्या तुलनेत क्रिष्णापट्टणम पोर्टचे अंतर ८५० कि़मी.आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्टच्या तुलनेत क्रिष्णापट्टणम पोर्टवरून नागपूरपर्यंत वेळ आणि भाड्यात बचत होते. याशिवाय मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक फार क्लिष्ट असून त्यासाठी जास्त वेळ लागतो. या तुलनेत ही रेक ५५ तासांत क्रिष्णापट्टणममधून नागपुरात पोहोचली. आयसीडी पूर्वी मुंंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि आता क्रिष्णापट्टणम या नवीन पोर्टशी जुळल्याचा आनंद आहे. या पोर्टवरून बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर या देशात माल जाईल. कमी अंतरामुळे भाडेही कमी लागेल. तीन दिवसानंतर दुसरी रेक येणार असल्याचे सत्पथी यांनी सांगितले. मध्य रेल्वेने खापरीपासून मिहानमधील कॉन्कोरपर्यंत रेल्वे सुविधा (सायडिंग) तातडीने उपलब्ध करून दिल्यास आयातीत माल मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत मिहानमध्ये येण्याचा अंदाज सत्पथी यांनी व्यक्त केला.याप्रसंगी सीमाशुल्क विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. पिंकी बस्के, आयसीडी नागपूरचे महाव्यवस्थापक राजीव भोवल, व्यवस्थापक अरविंदकुमार, केपीसीटी (मार्केट आयएनजी) महाव्यवस्थापक कॅ. बिजय शेखर, मार्स्क लाईनचे शशी चौधरी, केपीसीटीचे विपणन व्यवस्थापक वैभव जोशी आणि विपणन प्रतिनिधी कीर्तिराज धाऊंजेवार उपस्थित होते.
कॉन्कोर मिहानमध्ये आयातीत कंटेनरचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:01 AM
कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची माहिती कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या इनलँड कंटेनर डेपो(आयसीडी)नागपूरचे महाव्यवस्थापक अनुप कुमार सत्पथी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देचीनमधून क्रिष्णापट्टणमला आयात : सौर ऊर्जेची उपकरणे