शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

विश्वसनीयतेवर मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व

By admin | Published: August 04, 2014 12:56 AM

न्यायालयामध्ये मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व विश्वसनीयतेवर ठरत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ही बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व बयान अन्य

हायकोर्ट : सत्यतेबाबत समाधान होणे आवश्यकराकेश घानोडे - नागपूर न्यायालयामध्ये मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व विश्वसनीयतेवर ठरत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ही बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व बयान अन्य तथ्यांसोबत पडताळून पाहिलेच पाहिजे हे आवश्यक नाही. सत्यतेबाबत समाधान झाल्यास केवळ मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरविले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने वरील खुलासा करून स्वत:च्या मुलाला जाळणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. सुखदेव टिकाराम भारद्वाज (३५) असे आरोपीचे नाव असून तो वैरागड, ता. आरमोरी येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड भरला नाही तर एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांनी त्याचे अपील फेटाळून लावले. मृताचे नाव विशाल होते. खटल्यातील माहितीनुसार, सुखदेवने पहिली पत्नी सुनीताला घटस्फोट दिला होता. तो कोकाडी येथील रेवतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रेवतीपासून त्याला दोन मुले झालीत. विशाल मोठा मुलगा होता. सुखदेवसोबत भांडण झाल्यामुळे रेवती एकटीच माहेरी राहायला गेली होती. २२ जानेवारी २०१० रोजी पहाटे ४ च्या सुमारास सुखदेवने विशालला अंगावर रॉकेल टाकून जाळले. २३ जानेवारी रोजी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याने मृत्यूपूर्व बयानात सुखदेवने जाळल्याची माहिती दिली. विशाल ७०.५ टक्के जळाला होता. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते.