लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रमुख ऐतिहासिक स्थळ सिताबर्डी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात येणारे कस्तूरचंद पार्कमेट्रो स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या रिच-२ मधील सीताबर्डी इंटरचेंजपासून हे दुसऱ्या क्रमांकाचे स्टेशन आहे. कस्तूरचंद पार्कजवळ ऐतिहासिक गौरवशाली परंपरेनुसार स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे. प्राचीन कलाशैलीच्या आधारावर या स्थानकांची इमारत किल्ल्यासारखी आकर्षक असणार आहे.स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे निर्माण कार्य सुरू असून दोन्ही बाजूचे रूळ टाकण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक आणि प्रवासी सुविधांचे काम सुरू आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी ९५.२५ मीटर आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्टेशनचे डिझाईन एकापेक्षा एक आहे. हे मेट्रो स्टेशन सीताबर्डी किल्ल्याजवळ असल्याने या स्थानकांची वास्तूकला किल्ल्यासारखी बनविण्यात आली आहे. या वास्तूमध्ये प्राचीन कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम बघायला मिळणार आहे. के.पी. मेट्रो स्टेशन सीताबर्डी किल्ला, विधानभवन, रिझर्व्ह बँक, आकाशवाणी, रेल्वे स्टेशनच्या पश्चिमी द्वारापासून जवळ असल्याने प्रवाशांना फायदेशीर ठरेल.
कस्तूरचंद पार्क कामठी रोडवरील महत्त्वाचे स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:52 PM
प्रमुख ऐतिहासिक स्थळ सिताबर्डी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात येणारे कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
ठळक मुद्दे प्लॅटफॉर्मचे काम प्रगतीपथावर : इमारत किल्ल्यासारखी आकर्षक