शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ट्रायच्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये व्हावी सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:13 PM

महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनतीन महिन्यांची मागितली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे. ‘ट्राय’चा १ फेब्रुवारीपासून एमआरपी अ‍ॅक्ट लागू करण्यात येणार आहे. या नवीन कायद्याला केबल ऑपरेटर्सचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. सोमवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू करण्याची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे.यावेळी महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनचे विदर्भ संयोजक सुभाष बांते, प्रभात अग्रवाल, विजय कराडे, विवेक शेंडे, नॅलॉड डेव्हिड, श्याम मंडपे, हरविंदर भामरा, कमलेश समर्थ आदी उपस्थित होते.सुभाष बांते यांनी सांगितले की, कुठलीही तयारी न करता ट्रायने नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केबल ऑपरेटर्ससह ग्राहकांचाही त्रास वाढेल. त्यांनी सांगितले की, तीन महिन्याची मुदत देऊन या कायद्याला सुधारित स्वरूपात लागू करण्यात यावा. मुदत वाढवून केबल ऑपरेटर्सला प्रशिक्षित करण्यात यावे, ग्राहकांना पूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी.त्यांनी सांगितले की, या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता यासाठी आहे की, नियमानुसार पूर्वीची सिंगल चॅनल घेण्याची पद्धत रद्द करीत एकच ब्रॉडकास्ट पॅकेज बनवण्यात आले आहे. ते मागे घेण्यात यावे. यामुळे ग्राहकांना बळजबरीने चॅनल देण्याची पद्धत चुकीची आहे. परंतु आता ही पद्धत लागू केली जात आहे.बांते यांनी सांगितले की, नवीन नियमामध्ये एमएसओ(मल्टी सर्व्हिस ऑपरेटर)आणि केबल ऑपरेटर्सच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही. यात सुधारणा व्हावी. फाऊंडेशनने ग्राहक पंचायत, ग्राहक सेवा संघटना यांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्यावतीने सरकारकडे मागणी करावी की, पूर्वीप्रमाणेच व्यवस्था सुरू ठेवावी. जीएसटी १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के घेण्यात यावी.

चॅनल रोज बदलवीत आहेत किमतीमहाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनचे प्रभात अग्रवाल यांनी सांगितले की, ट्रायच्या नवीन कायद्यात पे चॅनलचे रेट निर्धारित करण्यात आले आहे. परंतु काही दिवसांपासून पे चॅनल रोज आपले रेट (किमती) बदलवीत आहेत. यामुळे केबल ऑपरेटर्सच्या समस्या वाढतील, कारण ते ग्राहकांना रेट लिस्ट देतात.

नवीन नियम ग्राहकांच्या हिताचेट्रायचे एमआरपीचे नवीन नियम हे ग्राहकांच्या हिताचे आहे. ते बदलण्याची गरज नाही. केबल ऑपरेटर्स हे मनोरंजन कर, प्रोफेशनल टॅक्स आणि त्यांच्याकडे असलेली ग्राहकांची संख्या ही खरंच सांगितल्यानुसार आहे का? हा खरा प्रश्न आहे. केबल ऑपरेटर्सला यात सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी पत्रपरिषद घेण्याऐवजी न्यायालयात दाद मागावी.देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव,अ.भा. ग्राहक कल्याण परिषद

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन