शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मनपा शाळांचा दर्जा सुधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:33 AM

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट आहे.

ठळक मुद्देमहापौरांचे शिक्षकांना आवाहन : शिक्षकदिनी १२ शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्याचा दर्जा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. महापालिकेचे नाव कसे उंचावेल यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. महापालिकेच्या शाळेचे नाव देशातील पहिल्या दहा शाळांमध्ये यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे शिक्षक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापालिकेचा शिक्षक दिन सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पाडला. यावेळी शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, दिव्या धुरडे, राजेंद्र सोनकुसरे, उज्ज्वला बनकर, प्रमिला मंथरानी, नगरसेवक सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.आ. गाणार म्हणाले, मी मनपाच्या शाळेमुळेच घडलो. माझी ओळख निर्माण करून देण्यात मनपाच्या शाळेचे योगदान मोलाचे आहे. शिक्षण विभागाच्या झालेल्या दुर्दशेवर नुसतीच चर्चा न करता त्याला कसे सुधारता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या खासगी शाळेचे वाढते प्रस्थ हे आपल्यासमोरील आव्हान आहे. त्या आव्हांनाना पेलत शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडत आपल्यावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. असे केल्यास मनपाच्या शाळांचे स्थान नक्कीच उंचावेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेले कष्ट हे खरंच दखल घेण्याजोगे आहे. मनपाच्या शाळांचे नाव उंचावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असल्याचे सांगितले.या वेळी सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, देशकर आदी उपस्थित होते. संचालन मधु आव्हाड यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले.आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदानशिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रसंगी मनपाच्या संजयनगर हिंदी माध्यामिक शाळेचे सुधाकर आमधरे, मनीषा मोगलेवार, अशोक चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. २०१६-२०१७ या शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.धाडसी विद्यार्थ्याचा गौरव३१ जुलै २०१७ ला राजू डोनारकर यांच्याकडे आग लागली होती. तेव्हा दुर्गा नगर माध्यामिक शाळेचा विद्यार्थी अविनाश शेंडे याने धाडस दाखवून त्या घरातील इलेक्ट्रिक स्वीच व सिलेंडरचे कॉक बंद केले. आत अडकलेल्या तीन महिलांना सुखरूप बाहेर काढले. या त्याच्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.