शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा 

By कमलेश वानखेडे | Published: December 01, 2023 3:07 PM

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागपूर : तेंगणात काँग्रेसला गळली लागली होती. काँग्रेसचे बहुतांश आमदार व नेते पक्ष सोडून गेले. मात्र, पक्षाचा राज्य प्रभारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर गेले ११ महिने काँग्रेस एकसंघ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेते काँग्रेसप्रति विश्वास निर्माण झाला. फक्त पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, ११ महिन्यांपूर्वी ४ जानेवारी रोजी आपल्याला तेलंगणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली होती. अ.भा. काँग्रेस कमिटीने मदतीला रोहीत चौधरी, विश्नुनाथ व मंसुर अली खान हे तीन सचिव दिले होते. तेलंगणा काँग्रेमध्ये प्रचंड अंतर्गत वाद होते.

सर्वप्रथम स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले. सर्वांशी समन्वय साधला. कुणाशीही भेदभाव केला नाही. पहिल्या तीन महिन्यात अंतर्गत वाद संपवले व एकत्र होऊन काम करायला सुरवात केली. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पाठबळ दिले. प्रदेशाध्यक्ष रेवंत रे़डी यांनी चांगले काम केले. काँग्रेस एकसंघ आहे असे चित्र जनतोसमोर गेले. त्यामुळे लोकांचाही विश्वास बसला की काँग्रेस लढण्यासाठी ताकदीने पुढे आली आहे.

‘भारत जोडो’मुळे वातावरण निर्मिती- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली. या यात्रेनंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या. शेवटच्या टप्प्यात भाजपसह बऱ्याच पक्षातील लोक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचेही गेलेले बरेच परत आले.

केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी- भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय पसरणे सुरू केले होते. मात्र, काँग्रेसने सर्वप्रथम सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी झाली. शेवटी केसीआर यांना चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील दौरे बंद करावे लागले. भाजप व टीआरएस मध्ये फाईट होईल, असेच सर्व म्हणत होते. पण आज काँग्रेस स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस