लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लग्नसराईत ग्राहकांसाठी खुशखबर असून दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याचे सराफा म्हणाले.
असे घसरले दर
दिनांक सोने चांदी३० ऑक्टो ८०,२०० १,००,०००१ नोव्हें ७९,४०० ९६,५००५ नोव्हें ७८,९०० ९५,५००११ नोव्हें ७७,३०० ९१,८००१२ नोव्हें ७५,८०० ९०,५००१३ नोव्हें ७५,६०० ९०,८००१४ नोव्हें ७४,५०० ८९,०००