शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

By नरेश डोंगरे | Published: July 01, 2023 3:08 PM

महाराष्ट्रात अपघाताचे भयावह चित्र : एकीकडे रस्ते चांगले झाले, दुसरीकडे अपघातही वाढले  

नरेश डोंगरे

नागपूर : रस्ते हे विकासाचे प्रतिक असतात, असे म्हटले जाते. मात्र, विकासाचे हेच प्रतिक विनाशाचे कारण बनल्याचे भयावह चित्र गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहे. राज्यात गेल्या अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. थरकाप उडविणारी महाराष्ट्रातीलअपघाताची गेल्या दोन वर्षांची आकडेवारी लोकमतच्या हाती आली आहे.

नागपूर ते पुणे अशा प्रवासाला निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची प्रवासी बस समृद्धी महामार्गावर उलटली आणि तिला आग लागून त्यात २५ जणांचा होपळून मृत्यू झाला. राज्यातील अलिकडच्या काळातील सर्वात भीषण अपघात ठरलेल्या या अपघाताने राज्यभरातील जीवघेणे अपघात पुन्हा एकदा चर्चेला आले आहेत. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षांचा अपघातांचा आढावा घेतल्यास कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी स्थिती आहे.

त्यानुसार, जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत राज्यात ६,३३७ अपघात झाले. त्यात ९, ९१५ जणांचा मृत्यू झाला. ८,६१० गंभीर जखमी झाले. तर, ३३६४ जण किरकोळ जखमी झाले. जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील विविध भागात ५,८९७ अपघात होऊन त्यात ६४३७ जणांचा मृत्यू झाला. ८६५७ जण जबर जखमी झाले तर ३४१५ जणांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची ही आकडेवारी कुणाच्याही मनाचा हिय्या करणारी ठरावी.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

आश्चर्यजनक आणि खेदजनकही

यातील सर्वात आश्चर्यजनक आणि खेदजनक बाब अशी आहे की, महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था गेल्या दोन वर्षांत कमालीची सुधारली आहे. गावोगावचे रस्ते प्रशस्त आणि चकचकीत झाले आहे. चांगले रस्ते झाले की अपघात कमी होतील, असा दावा अन् अंदाजही होता. तो मात्र या अपघातांच्या आकडेवारीमुळे खोटा ठरला आहे. एकीकडे रस्ते चांगले झाले तर दुसरीकडे अपघातही वाढले, अशी सध्याची स्थिती आहे.

*अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त असलेले १० जिल्हे*

२०२२ मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ८५५ अपघात मुंबईत झाले. त्यात १७५ जणांचा मृत्यू झाला तर ७५५ जण जखमी झाले.

  • अहमदनगर : अपघात - ७१४, मृत्यू -३८३, जखमी - ४४९
  • पुणे : अपघात - ६९४, मृत्यू - ३९०, जखमी - ६०७
  • कोल्हापूर : अपघात - ५४४, मृत्यू -२११, जखमी - ५५३
  • नागपूर : अपघात - ४८९, मृत्यू -२३०, जखमी - ५९८
  • सोलापूर : अपघात - ४६८, मृत्यू - २८३, जखमी - ४९१
  • चंद्रपूर : अपघात - ४१५, मृत्यू - २१८, जखमी -३०७
  • पिंपरी चिंचवड : अपघात - ४०१, मृत्यू - १५५, जखमी - ३०२
  • सांगली : अपघात -३६०, मृत्यू - १८७, जखमी -२८३
  • ठाणे : अपघात - ३५९, मृत्यू - ०९४, जखमी - ३१८

 

२०२३ मध्ये मुंबईत ४३९ अपघात झाले. त्यात ११३ जणांचा मृत्यू झाला तर ४०२ जण जखमी झाले.

  • अहमदनगर : अपघात -७४४, मृत्यू -३६५, जखमी - ५६९
  • पुणे : अपघात - ७२९, मृत्यू -३८५, जखमी - ६८९
  • कोल्हापूर : अपघात - ४७८, मृत्यू -१८२, जखमी - ४०४
  • नागपूर : अपघात - ४२७, मृत्यू -१९५, जखमी - ५४४
  • सोलापूर : अपघात - ५००, मृत्यू - २८३, जखमी - ४६८
  • चंद्रपूर : अपघात -३५५, मृत्यू -१५६, जखमी -३१२
  • पिंपरी चिंचवड : अपघात - ५०८, मृत्यू - १४७, जखमी - ३९५
  • सांगली : अपघात -३५८, मृत्यू - १७३, जखमी -२३२
  • ठाणे : अपघात - ३८१, मृत्यू - ०८८, जखमी -३४३

 

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्रroad safetyरस्ते सुरक्षा