शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

खोट्या कागदपत्रांद्वारे एनआयटीचे तब्बल २४ कोटींचे भूखंड बळकावले; पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: June 12, 2024 4:46 PM

खोट्या कागदपत्रांच्या आधारे एनआयटीचे तब्बल २४.३५ लाखांचे भूखंड बळकविण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

योगेश पांडे, नागपूर : खोट्या कागदपत्रांच्या आधारे एनआयटीचे तब्बल २४.३५ लाखांचे भूखंड बळकविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीने आणखी असे कारस्थान केले आहेत का याचा शोध सुरू आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

नारी येथे एनआयटीच्या मालकीचे खसरा क्रमांक १५५-१, १५५-३, १५५-४, १५५-५, १५५-८ हे भूखंड आहेत. मात्र २०१७ साली हे भूखंड काही खाजगी व्यक्तींच्या नावे झाल्याची बाब समोर आली. याचे तपशील काढला असता दीपक त्र्यंबक देशमुख व किशोर त्र्यंबक देशमुख (वाठोणा, आर्वी, वर्धा), मुग्धा नंदकिशोर पाठक (मानसमंदिर चौक, वर्धा), जयश्री किसनराव कस्तुरे (नरेंद्रनगर), ज्योती चंदन जामगडे (जेठपुरा, चंद्रपूर) यांच्या नावे ही जमीन असल्याचे स्पष्ट झाले. या आरोपींनी २६ मे २०१७ रोजी नगर भूमापन अधिकारी-२ येथील अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून आखीव पत्रिकेत बदल करवून घेतले. तसेच आरोपींनी खसरा क्रमांक १४१-१ व १४२-२ या एनआयटीच्या मालकीच्या जमिनीबाबतदेखील असाच प्रकार केला. ती जमीन त्यांनी २०१८ साली विक्रमसिंह गुज्जरला विकली. हा प्रकार समोर आल्यानंतर एनआयटीचे विभागीय अधिकारी कमलेश टेंभुर्णे यांनी आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस