सुमेध वाघमारे , नागपूर : सुनील डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनीलआणि डॉ. कविता गुप्ता, दोघांनाही असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, मध्य प्रदेश चॅप्टरच्या २९ व्या वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मधुमेह क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. गुप्ता दाम्पत्य यांना डॉ. त्यागी, डॉ. पी. सी. मनोरिया, डॉ. सुरेश रांका व डॉ. संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सुनील आणि डॉ. कविता गुप्ता हे गेल्या तीन दशकांपासून मुधमेहाची जनजागृती, संशोधन आणि शिक्षणात गुंतलेले आहेत. डॉ. गुप्ता यांना २१ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत.