शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कडेकोट बंदोबस्त अन सीसीटीव्हीच्या देखरेखीत पोलीस भरतीला सुरुवात

By योगेश पांडे | Published: June 19, 2024 5:22 PM

२०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरतीप्रकियेतील शारीरिक चाचणीला बुधवारपासून सुरुवात झाली.

योगेश पांडे, नागपूर२०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती प्रकियेतील शारीरिक चाचणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पोलीस लाईन टाकळीच्या मैदानात सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या देखरेखीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही विभागांच्या ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले आहेत.

नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलिस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्या २५५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बुधवारपासून याला सुरुवात झाली. पोलीस शिपाईपदांसाठी एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ७१३ महिला आहेत. तर कारागृहातील भरतीसाठी ५५ हजार २९७ अर्ज मिळाले असून, त्यात १५ हजार ६१८ महिला आहेत. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह विभाग शिपाई पदांसाठी सुरू झालेल्या या भरतीत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत शारीरिक चाचणी घेण्यात आल्या. परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमूदेखील तैनात होती.

असे आहे नियोजन-

बुधवारी सकाळी भरतीला प्रारंभ झाला. प्रमाणपत्र तपासणी, छाती उंचीचे मोजमाप आणि शंभर मीटर धाव शर्यत झाल्यावर पुढील प्रक्रिया असेल. उमेदवारांना १६०० आणि ८०० मीटर धाव पूर्ण करावी लागेल. बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटल्यावर प्रवेशद्वारामधून मैदानात प्रवेश देण्यात येत आहे. भरतीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,पोलीस गुप्तचर विभाग यासह सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे यांची करडी नजर राहणार आहे

तृतीयपंथी देखील मैदानात-

यंदाच्या या भरतीत तृतीयपंथी देखील पोलीस होण्यासाठी इतरांशी मुकाबला करणार आहे. पोलीस विभाग व कारागृह विभागासाठी प्रत्येकी पाच तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस