नागपूर : विदर्भात दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा हवामान खात्याने दिला हाेता. सकाळपासून उन्हाच्या चटक्यांनी तसा अनुभवही दिला. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलले. आकाश ढगांनी व्यापले आणि विजांच्या गर्जनासह पावसाच्या सरी बरसल्या. पावसाच्या हजेरीने उष्णतेची दाहकता कमी झाली.
रविवारी नागपूरचे कमाल तापमान ४१.२ अंश नाेंदविण्यात आले. दाेन दिवसांपूर्वी पारा ४३ अंशावर गेला हाेता. चंद्रपूरमध्ये मात्र सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नाेंद झाली. चंद्रपुरात या सिजनमधील हे सर्वाधिक तापमान म्हणावे लागेल. इतर सर्व शहरात पारा २४ तासात काही अंशाने खाली आला. अमरावतीत तापमान ३ अंशाने घसरत ४०.४ अंशाची नाेंद झाली. याशिवाय अकाेला ४१.५ अंश, यवतमाळ ४१.२ अंश, वर्धा, ४२ अंश, गडचिराेली ४२.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले. बुलढाणा वगळता इतर सर्व शहरात रात्रीचा पारा सरासरीपेक्षा माेठ्या फरकाने खाली घसरला आहे.
नागपुरात सकाळी उन्हाची तीव्रता अधिक हाेती. पारा ४३ अंशाच्यावर जाईल, असे चित्र हाेते पण ढगांनी सूर्याचा ताप राेखला आणि पावसाने उष्णतेची तीव्रता मंदावली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वातावरणासह पाऊस सुरू झाला. शहरात सर्वत्र टपाेऱ्या थेंबांसह हलक्या सरींची बरसात झाली. अर्धा तास पावसाचा खेळ चालला. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला.
उष्ण लाटांचा इशारा कायमदरम्यान ढगाळ वातावरण व पावसाने उन्हाचे चटके कमी केले असले तरी हवामान विभागाकडून अद्याप उष्ण लाटांचा इशारा कायम आहे. मात्र यावेळी ६ ते ८ जूनदरम्यान तापमान वाढण्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.