मंगेश व्यवहारे, नागपूर : गेल्या ८ दिवसांपासून आशा वर्कर प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनावर असून, त्यांच्या मागण्यांचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना २००० रुपये दिवाळी भेट, आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात ७००० रुपयांची वाढ व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १०००० रुपयांची वाढ देण्याचा, प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला आहे.
मात्र २४ जानेवारी आणि बुधवारी होणारी मंत्रीमंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे आशांच्या मागणीच्या प्रस्तावावर निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे आशा वर्करनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संविधान चौकात आंदोलन केले. श्यामजी काळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात मंगला पांडे, मंदा डोंगरे, मंगला लोखंडे, फुलन घुटके, संगिता गौतम, निलीमा गाडरे, सुकेशनी फुलपाटील, समिक्षा गायकवाड, शितल कळमकर, मोहीनी बालपाडे, पौर्णिमा वासे, ज्योती रक्षित, उषा लोखंडे, प्रिती तलमले यांच्यासह मोठ्या संख्येने आशा सहभागी झाल्या होत्या.