आज पुरस्कार वितरण : ‘संगीत संध्या’ चे आयोजन नागपूर : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कलार्जन फाऊंडेशन संस्थेच्यावतीने स्वराज जनकल्याणकारी ग्रामीण विकास संस्था व नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने घेण्यात येत असलेल्या कलार्जन महास्पर्धेचे रविवारी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या महास्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ उद्या (मंगळवारी) धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता होईल. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंदजी उपस्थित होते. दरम्यान नितीन गडकरी यांनी उद्घाटनपर भाषणातून छोटी मुले हेच देशाचे भविष्य असल्याचे सांगितले. कलार्जन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा कोहळे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सुनीता धोटे यांनी केले. महास्पर्धेत मेहंदी, रांगोळी, चित्रकला व ‘लिखो मन के विचार’ अशा चार स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात सुमारे पाच हजार स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन ११ व १२ जानेवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत चालणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण होईल; सोबतच ‘संगीतसंध्या’चे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
कलार्जन महास्पर्धेचे उद्घाटन
By admin | Published: January 12, 2016 3:09 AM