शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर विभागातील ३६ आरयूबीचे लोकार्पण; २६ फेब्रुवारीचा मुहूर्त

By नरेश डोंगरे | Published: February 22, 2024 1:02 PM

देशभरातील विविध रेल्वे स्थानकांच्या विकास कामांची पायाभरणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने २६ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींच्या लोकार्पणाचाही त्यात समावेश आहे. 

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ रोड अंडर ब्रीजेस (आरयूबी)चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे. विदर्भासह मध्य प्रदेशातील आरयूबीचाही त्यात समावेश आहे.

देशातील १५०० आरओबी (रोड ओव्हर ब्रीज) आणि अंडर ब्रीजचे उद्घाटन / लोकार्पण तसेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांवरील विकास कामांची पायाभरणी करण्याचे ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने २६ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींच्या लोकार्पणाचाही त्यात समावेश आहे. हे सर्व पूल आमला-छिंदवाडा, आमला-ईटारसी, आमला-नागपूर, नागपूर - वर्धा, वर्धा - धामनगाव, नरखेड-अमरावती आणि सेवाग्राम - बल्लारशाह मार्गावर आहेत. 

क्रॉसिंग गेट काढले जाणारआरओबी आणि आरयूबी निर्माण करण्यात आल्यामुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, यामुळे जागोजागी अडथळ्यासारखे असलेले रेल्वे क्रॉसिंग गेट काढले जाणार असल्याने वाहने आणि रेल्वे गाड्यांमधील अपघाताचा धोका कमी होईल. वारंवार जागोजागच्या नागरिकांना, वाहनधारकांना क्रॉसिंग गेटवर रेल्वे गाडी जाण्याची वाट पहात ताटकळत राहावे लागते. अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होतो. तो यामुळे होणार नाही. नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वेळ वाचेल. सोबतच क्रॉसिंग गेटजवळ रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे गाडी विलंबाने पोहचण्याची शक्यता असते, तेदेखिल यामुळे होणार नाही. 

प्रदुषण कमी होईलरेल्वे क्रॉसिंग गेटमुळे दिवसरात्र वारंवार अनेक वाहने गेटवर अडकून पडतात. लवकरच गाडी येईल, या अपेक्षेत अनेक चालक आपले वाहन सुरूच ठेवतात. त्यामुळे नाहक पेट्रोल, डिझेल जळते आणि त्यामुळे परिसरातील वातावरण प्रदुषित होते. क्रॉसिंग गेटचा अडथळा दूर होणार असल्याने प्रदुषणाचा धोका निकाली निघेल आणि संबंधित वाहन धारकांच्या पेट्रोल, डिझेलची बचत होऊन त्यांना ईच्छित ठिकाणी पोहचण्यास मदत होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी