शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:33 PM

२२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहरातील रंगकर्मी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देशहरातल्या रंगकर्मींची भरगच्च उपस्थिती : पूर्वरंगच्या हालचालींना वेग येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहरातील रंगकर्मी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, समितीचे संयोजक व मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, समन्वयक प्रवीण दटके, मनपातील विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, शेखर सावरबांधे, अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, ज्येष्ठ रंगकर्मी बापू चनाखेकर यांच्यासह अनिल कुळकर्णी, संजय पेंडसे, नरेंद्र शिंदे, राजेश चिटणीस, संजय जीवने, विदर्भ साहित्य संघाचे दिलीप म्हैसाळकर, रवींद्र दुरुगकर, श्याम पेठकर, नंदू कव्हाळकर, बळवंत येरपुडे, किशोर आयलवार, सोमेश्वर बालपांडे, कीर्तीद राईकर, अभय देशमुख, स्नेहल कुचनकर, मुकुंद वसुले, विनोद राऊत, प्रदीप धरमठोक, रुपाली कोंडेवार आदींसह मोठ्या संख्येने नाट्य कलावंत व कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना गिरीश गांधी म्हणाले, पुण्या-मुंबईला मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होताना सर्वपक्षीय नेत्यांचा एकत्रित सहभाग दिसून येतो. आतापर्यंत नागपुरात ही उणीव होती. मात्र नाट्य संमेलनाच्या आयोजन समितीमधील सदस्यांमुळे सर्वपक्षीय सहयोगाची वातावरणनिर्मिती झाली आहे. संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हे वातावरण असेच राहावे, अशी सदिच्छा त्यांनी दिली. प्रफुल्ल फरकासे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, नाट्य संमेलनाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, दोन विदेशी नाट्य संस्थांनी नोंदणी केली आहे. मराठी नाट्यरसिक सर्वत्र पसरले असून, सर्वांना संमेलनाबाबत उत्सुकता आहे. संमेलनासाठी चार ते साडेचार कोटींचा खर्च येणार असून, हा शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांचा हातभार लागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संचालन अ.भा. नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी केले. स्वागत समितीचे सचिव संजय भाकरे यांनी आभार मानले.रंगकर्मी व सदस्यांची नोंदणी सुरूकार्यालयाच्या उद्घाटनासह रंगकर्मींची तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्यांवर सदस्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी फॉर्म तयार केला असून ते कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. नियोजन आणि कार्यक्रमांच्या आखणीसाठी आयोजन समितीची बैठक होणार असल्याची माहिती नरेश गडेकर यांनी दिली.५ पासून महापौर करंडक एकांकिकानाट्य संमेलनाच्या पूर्वरंगअंतर्गत येत्या ५ फेब्रुवारीला महापौर करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. ही फेरी केवळ शहरातील एकांकिकांसाठी असेल. यानंतर १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून यामध्ये राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन नाटकांचा सहभाग राहणार असल्याचेही गडेकर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर