शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

योगविद्येचा अभ्यासक्रमांत समावेश करा

By admin | Published: March 15, 2015 2:14 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी योगविद्येसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी योगविद्येसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. योगविद्येचा प्रसार करणे आवश्यक असून केंद्र व राज्य शासनांनी याला शैक्षणिक अभ्यासक्रमांत स्थान द्यावे, अशी सूचना या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात आली व याला एकमताने संमत करण्यात आले.सभेच्या दुसऱ्या दिवशी हा प्रस्ताव मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्राने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघ, याबाबत प्रस्ताव मांडणारे व अनुमोदन देणारे देश, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगभरात योगविद्येचा प्रसार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचे आभार मानण्यात आले. योगविद्येचा प्रसार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी योगविद्येत संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत प्रतिनिधींकडून मांडण्यात आले. दरम्यान, संघप्रणीत शिक्षण संघटनांनी वर्षभराचा लेखाजोखा प्रतिनिधी सभेसमोर मांडला. शिवाय संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. यात संघशाखांचा विस्तार, भविष्यातील रणनीती यांचा उल्लेख झाला.(प्रतिनिधी)केंद्रासोबत समन्वयाची आवश्यकता नाहीकेंद्र शासनासमवेत समन्वयासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु केंद्र शासनात संघशिस्तीतूनच घडलेल्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय राखण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नाही. त्यांना सल्ला देण्याची किंवा त्यांच्या कामात दखल देण्याची गरज संघाला वाटत नाही. केंद्रातील नेते सक्षम आहेत, असे मत संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले.संघस्थानी मुख्यमंत्री, गडकरींची भेटदरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू असतानाच शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. त्यांनी प्रतिनिधी सभेत उपस्थिती लावली नाही, परंतु परिसरात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल हे या प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. संघप्रणीत इतर संघटनांप्रमाणे भाजपाकडून २०१४-१५ या वर्षाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात या नेत्यांनी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.संघ गणवेशात होऊ शकतो बदलसंघाच्या गणवेशात बदल होण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चांना ऊत आला आहे. याबाबत संघातर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आली. संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल झाले आहेत. आद्यसरसंघचालक डॉ. केशब बळीराम हेडगेवार यांच्या काळातील आणि आताच्या गणवेशात बराच फरक आहे. मागील सभेत संघाच्या ‘बेल्ट’मध्ये बदल झाला. संघाची ओळख ही गणवेश नसून सेवाकार्य आहे. त्यामुळे भविष्यात गणवेशात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले.