लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी खासदार महोत्सवाचा आरंभ ‘यादों का चला कारवाँ’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी गायन, वादनाची झंकार प्रेक्षकांना दिली. गायक मदन शुक्ला यांनी ‘आनेवाला पल जानेवाला है...’ या गीताने सुरुवात केली. पुढे सोनाली काणे यांनी ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना...’ या दिलखेचक गीताचा नजराणा दिला. अनिल कपूर व जॅकी श्रॉफ मंचावर असताना कलावंतांनी या दोघांच्या चित्रपटातील गाणी सादर केली. ‘कहदो की तुम हो मेरी वर्ना..., सुन बेलिया शुक्रीया मेहरबानी...काटे नही कटते ये दिन ये रात...’ अशी काही गीते होती. दोन्ही अभिनेत्यांनी आठवणीत डोकावताना स्वत: गायनात सहभागी होत या गीतांचा मनमुराद आनंद लुटला. पुढे या कलावंतांनी ‘देखा ना हाय रे सोचा ना..., मै हुं डॉन..., मुंगडा...’ अशी मदहोश करणारी गीते सादर करून श्रोत्यांना झुमायला भाग पाडले. मी गीतसंगीताचा शौकिनयावेळी नितीन गडकरी यांनी हा महोत्सव माझ्या मनाशी जुळला असून मी गीतसंगीताचा पक्का शौकिन असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या व्यस्त दौऱ्याचा उल्लेख करीत केनिया व दुबईच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आज नागपूरला हजेरी लावल्याचे सांगितले. आज पुन्हा मुंबई व शनिवारी बंगळूरू व म्हैसूरमध्ये भेट देऊन सायंकाळी बाबूजींची गाणी ऐकण्यासाठी हजेरी लावणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
आनेवाला पल जानेवाला है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:54 PM
शुक्रवारी खासदार महोत्सवाचा आरंभ ‘यादों का चला कारवाँ’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी गायन, वादनाची झंकार प्रेक्षकांना दिली. गायक मदन शुक्ला यांनी ‘आनेवाला पल जानेवाला है...’ या गीताने सुरुवात केली. पुढे सोनाली काणे यांनी ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना...’ या दिलखेचक गीताचा नजराणा दिला.
ठळक मुद्देखासदार महोत्सव : बहारदार गाण्यांचा ‘यादो का चला कारवाँ’