लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : कृषी विभागाने काटाेल तालुक्याचे खरीप पीक नियाेजन नुकतेच जाहीर केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र तीन हजार हेक्टरने वाढले असून, साेयाबीनचे पेरणी क्षेत्र मात्र ४,८५५ हेक्टरने कमी झाले आहे. दुसरीकडे, साेयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली असून, बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने कंपन्यांसाेबतच घरगुती बियाण्यांच्याही किमतीही वाढल्या आहेत.
मागील काही वर्षापासून किडी व राेगांचा प्रादुर्भाव तसेच प्रतिकूल वातावरणामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. त्यातच साेयाबीनला भावदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाला पर्याय म्हणून कपाशीला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात २६,००२ हेक्टरमध्ये नियाेजन करण्यात आले हाेते. हे क्षेत्र चालू हंगामात २९,००० हेक्टर करण्यात आले आहे. सन २०२०-२१ च्या हंगामात १४,८५५ हेक्टरमध्ये साेयाबीन पिकाचे नियाेजन केले हाेते. ते यावर्षी १०,००० हेक्टरवर आले आहे. याशिवाय भुईमुगाचे क्षेत्र ७९४ हेक्टरने वाढले आहे. मागील हंगामात ते ४०६ हेक्टर हाेते तर, चालू हंगामात १,२०० हेक्टरचे नियाेजन करण्यात आले आहे.
उत्पादन खर्च कमी असल्याने पूर्वी शेतकरी साेयाबीनच्या पिकाला प्रथम प्राधान्य द्यायचे. मात्र, काही वर्षांपासून चित्र पालटले आहे. साेयाबीनच्या उत्पादनात दरवर्षी घट येत असून, बाजारात भावदेखील मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी साेयाबीनच्या पिकाला पर्याय शाेधत आहेत. साेयाबीन बियाण्यांचे दर वाढल्याने शासनाने यावर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊत, आकाश गजबे, प्रशांत खंते, नितीन ठवळे, प्रवीण गोडबोले, अशपाक काजी यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
...
साेयाबीनची उगवणशक्ती कमी
साेयाबीनचे क्षेत्र कमी झाले असले तरी काही शेतकऱ्यांना साेयाबीनच्या बियाण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, बाजारात साेयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना कंपन्यांचे बियाणे १०,३५० रुपये ते ११,५०० रुपये प्रति क्विंटल तर घरगुती बियाणे ८,००० रुपये ते १०,००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावे लागत आहे. मागील हंगामात किडी व राेगाचा प्रादुर्भाव आणि कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.