नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी शहरातील ७ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र, ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूची संख्या स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात २२ ते २८ ऑगस्टदरम्यान २९ रुग्ण आढळून आले. मृत्यूची नोंद झाली नव्हती. परंतु, २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ होऊन ३५ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूचीही भर पडली. विशेष म्हणजे, १६ ते २१ ऑगस्ट या आठवड्यात केवळ १८ रुग्ण आढळून आले होते. यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे असणार, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील पाच दिवसांपासून चाचण्या वाढल्या आहेत. यामुळे मनपाच्या संस्थात्मक विलगीकरणाचा प्रभाव चाचण्यांवर पडला नसल्याचे दिसून येत आहे. आज ५,५६२ चाचण्या झाल्या. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०५० झाली असून मृतांची संख्या १०११९ वर स्थिर आहे. कोरोनातून ६ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणा-यांची संख्या ४,८२,८८९ झाली आहे.
:: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ५,५६२
शहर : ७ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,०५०
ए. सक्रिय रुग्ण : ४२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,८८९