नागपूर : नागपूर शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी १५० कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केली.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी ही मागणी केली. खा. तुमाने यांनी निर्बंध लावण्याने नागरिक अडचणीत असल्याचे मत व्यक्त केले. शहरातील व्यापारावर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने लॉकडाऊन लावू नये, यामुळे व्यापारी व ग्रामीण भागातील नागरिकांचे नुकसान होत असल्याचे मत व्यक्त करून, कोविडसंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंच व सचिव यांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली.