शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
5
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
6
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
7
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
8
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
9
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
10
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
11
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
12
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
13
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
14
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
15
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
16
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
17
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
18
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
19
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
20
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महिला अत्याचारामध्ये वाढ महिन्याला सरासरी २४ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:19 IST

पोलिसांचे दावे पोकळ : विनयभंगाच्या घटनांवर ठोस नियंत्रण नाहीच

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षभरात शहरातील गंभीर गुन्ह्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. पोलिस अधिकाऱ्यांकडून महिला सुरक्षेचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीत अल्पवयीन मुली व महिला आता सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. वर्षभरात महिला अत्याचार व विनयभंगांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला अत्याचारांमध्ये वाढ दिसून आली. जर आकडेवारीची सरासरी काढली तर महिन्याला सरासरी २४ गुन्ह्यांची नोंद झाली. ही आकडेवारी महिला सुरक्षेचे दावे करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे.

लोकमत'ला प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नागपुरात महिला अत्याचाराच्या २८५ घटनांची नोंद झाली. दर महिन्याला अत्याचारांची सरासरी जवळपास २४ इतकी होती. २०२३ मध्ये महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती व दर महिन्याची सरासरी २२ इतकी होती. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे परिचयातीलच व्यक्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक चतुर्थांशहून अधिक प्रकरणात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. 

विनयभंगांचा आकडा चिंताजनकच नागपुरात भर रस्त्यांवर होणाऱ्या विनयभंगाच्या घटना मोठा चिंतेचा विषय आहे. २०२३ मध्ये विनयभंगाच्या ५०६ घटनांची नोंद झाली होती.२०२४ मध्ये पोलिसांनी विनयभंगाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यामुळे गुन्हेगारांवर फारसा वचक नसल्याचे चित्र आहे. २०२४ मध्ये ४९० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात ३१५ हून अधिक पुरुष व १५ महिलांना अटक करण्यात आली.

महिलांचादेखील आरोपींमध्ये समावेश २०२४ मध्ये २०० पुरुष आरोपींना अटक करण्यात आली. तर दोन महिलांवरदेखील गुन्हे नोंदवत त्यांना ताब्यात घेण्यात आले. महिला अत्याचाराच्या प्रकरणांत महिलादेखील आरोपी निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महिनानिहाय गुन्हे (अत्याचार)महिना                २०२४             २०२३जानेवारी                २२                    २० फेब्रुवारी                २०                    १४ मार्च                      २८                    १८ एप्रिल                    २७                   २६ मे                         २५                    ३०जून                       ३२                    २३ जुलै                      २५                    २७ ऑगस्ट                  २५                    २० सप्टेंबर                   २२                     २-ऑक्टोबर               २३                    १७ नोव्हेंबर                  १२                    १७ डिसेंबर                  १३                    १५ 

महिनानिहाय गुन्हे (विनयभंग)महिना               २०२४                २०२३जानेवारी               ४२                     ४२ फेब्रुवारी               ४०                      ३५ मार्च                     ३३                     ४७ एप्रिल                   ३९                      ३९ मे                         ४८                     ४७ जून                       ३८                     ४२ जुलै                      ३९                      ४९ ऑगस्ट                  ४२                     ४८ सप्टेंबर                   ५४                     ४० ऑक्टोबर               ७५                    ५२ नोव्हेंबर                  ३३                     ३० डिसेंबर                   ४१                    ३२

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर