नागपूर : एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागा वाढविण्यात याव्यात अशा मागणीसह परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. गेल्यावर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गाला ११३४ जागा मिळाल्या होत्या. यावर्षी आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता १२ टक्के आरक्षण लागू झाले. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या २५९ जागा कमी झाल्या असून त्यांच्या वाट्याला ८७५ जागा आल्या आहेत. या जागांवर आरक्षित प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेण्याची मुभा आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:14 AM