लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातून जाणाऱ्या भंडारा रोडचा विकास संथ गतीने सुरू आहे. विकास कार्यासाठी रोड उखडून ठेवण्यात आला आहे. रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता महापालिका आयुक्त व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना नोटीस बजावून यावर २८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. रोडचे विकास कार्य तातडीने पूर्ण करण्यात यावे, नागरिकांना वारंवार न्यायालयात यावे लागू नये यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व व्हॉटस् अॅप सेवा सुरू करण्यात यावी इत्यादी मागण्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात सादर एका माहितीनुसार, देशामध्ये दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रोडवरील खड्ड्यांमुळे जास्त नागरिकांनी प्राण गमावले आहेत असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. हरनीश गढिया यांनी बाजू मांडली.
भंडारा रोडवर वाढले अपघात : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:34 AM
शहरातून जाणाऱ्या भंडारा रोडचा विकास संथ गतीने सुरू आहे. विकास कार्यासाठी रोड उखडून ठेवण्यात आला आहे. रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्दे महामार्ग प्राधिकरणला नोटीस