नीरीने एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ इतवारी आणि नीरी म्हणजेच औद्याेगिक, बाजारपेठ व निवासी, अशा तीन स्टेशनवरून माॅनिटरिंग केले. त्यामध्ये हवेच्या प्रवाहानुसार निवासी म्हणजे नीरीच्या केंद्रावरील धूलिकणांचे प्रदूषण अधिक असल्याचे आढळून आले. शहरात धावणारी वाहने, नागरिकांची रेलचेल आणि सर्वाधिक इमारती आणि मेट्राेसारख्या विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाचा मारा अधिक हाेत असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे.
- पीएम-१० : औद्याेगिक क्षेत्रात १४.४ टक्के, बाजारपेठेत ४७.२ टक्के व निवासी क्षेत्रात ५२.१ टक्के. एप्रिल ते जून व नाेव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात.
- पीएम-२.५ निवासी क्षेत्रात इतरांपेक्षा ११.५ टक्के अधिकच.
- एसओ-२ व एनओ-२ हे सीपीसीबीच्या ८० मायक्राेग्रॅम/घनमीटर मानकापेक्षा कमी आढळले.
- ओझाेन-३ काॅन्सन्ट्रेशन ३७.९ माग्रॅम/घनमीटर. कार्बन माेनाक्साइड २ मा.ग्रॅम/घनमीटरपेक्षा कमी.
- दिवाळीनंतरच्या काळात या सर्व प्रदूषकांच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे आढळून आले.
लाॅकडाऊनच्या काळात कमालीची घट
- लाॅकडाऊनच्या पहिल्या २० दिवसांत सरासरी घट पीएम-१० - २८.७ टक्के, पीएम-२.५ - २६.६ टक्के, एसओ-२ - ६९.९ टक्के, एनओ-२ - ५५.३, काॅर्बन माेनाक्साइड २५ टक्के.