नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. ७ ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली असताना, गुरुवारी आठ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे, ११ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूचीही नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९५१ तर, मृतांची संख्या १०,११८ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज चाचण्यांची संख्या वाढली. शहरात ५,१९२ तर ग्रामीणमध्ये १,१७० असे एकूण ६,३६२ चाचण्या झाल्या. शहरात पॉझिटिव्हिटीचा दर ०.०९ टक्के, ग्रामीणमध्ये ०.०८ टक्के तर जिल्ह्यात हाच दर ०.१२ टक्क्यांवर आला आहे. शहरात पाच रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणमध्ये एक रुग्ण तर, जिल्हाबाहेर दोन रुग्ण आढळून आले. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,४०,०२२, मृतांची संख्या ५५,८९२, ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या १,४६,११७ व २,६०३ मृत्यू तर, जिल्हाबाहेर ६,८१२ रुग्ण व १६२१ मृत्यूची नोंद झाली आहे. आज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी सात रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,८२,७०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यांचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. सध्या १३४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यातील ८४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, ४७ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात आहेत.
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ६,३६२
शहर : ५ रुग्ण व १ मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए.बाधित रुग्ण :४,९२,९५१
ए.सक्रिय रुग्ण : १३४
ए.बरे झालेले रुग्ण : ४,८२,७०२
ए.मृत्यू : १०,११८