लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे. सोमवारीदेखील चौरईमधून पाणी सोडणे सुरूच होते. मात्र त्याचा वेग आता निम्म्यावर आणला आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता चौरई धरणाच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले. सध्या ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याचा स्तर वाढला असता तरी एवढ्या लवकर पाणीकपातीमधून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तोतलाडोहचा जलस्तर १२३ वरून १८० दशलक्ष घनमीटर (एमएमक्युब) झाला आहे. तोतलाडोहचा जलस्तर रविवारच्या तुलनेत सोमवारी ५७ एमएमक्युबने वाढला आहे.मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलस्तर वाढला असता तरी नियमित पाणीपुरवठा करण्याएवढी स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे; नंतर जलस्तर वाढल्यावर त्यावर विचार केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातही पाणीकपात सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे.रविवारी पहाटे ४ वाजता चौरईचे सहा दार उघडण्यात आले होते. त्यातून ९८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी सकाळी ८ वाजता दोन दार बंद करण्यात आले होते.मनपा पाणीपुरवठा सभापती पिंटू झलके म्हणाले, चौरईतून पाणी सोडणे सुरूच आहे. येत्या २४ तासात तोतलाडोहचा जलस्तर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तोतलाडोहमध्ये समाधानकारक साठवणूक झालेली नाही. त्यामुळे पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता नाही. पुढील स्थितीवर हे अवलंबून असेल.तोतलाडोहमध्ये सोमवारी सकाळी ८.३० वाजता १८ टक्के पाण्याच्या पातळीची नोंद करण्यात आली. यात १८० एमएमक्युब पाणी आहे. मागील वर्षी या काळात २३.१४ टक्के पाणी होते. तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ एमएमक्युब आहे. सध्या येथे ३३०.०२ एमएमक्युब पाणी शिल्लक असून, वापरण्यालायक पाणी १८० एमएमक्युब आहे.नवेगावमध्ये किंचित वाढनवेगाव खैरी (पेंच) प्रकल्पात रविवारच्या तुलनेत सोमवारी ०.४१ टक्के वाढ झाली. मागील वर्षी या काळात येथे ३९.३१ टक्के पाणी होते. सध्या नवेगाव खैरी प्रकल्पात ७८.३१ एमएमक्युब पाण्याचा साठा आहे. त्यातील ३९.६१ एमएक्युब वापरायोग्य आहे. या जलाशयाची निर्धारण क्षमता १८० एमएमक्युब आहे.
तोतलाडोहच्या पातळीमध्ये १८ एमएमक्युबने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:08 PM
मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे.
ठळक मुद्देचौरईच्या सहापैकी दोन दरवाजे बंद : विसर्गाचा वेग निम्म्यावर