शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:10 AM

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते ६ वर्षे वयोगटात २०१६-१७ मध्ये अतितीव्र ५९७, तर तीव्र २७३० कुपोषणग्रस्त बालकांची संख्या होती. २०२०-२१मध्ये ती वाढून अतितीव्र १५६९, तर तीव्र स्वरूपातील ९७०२ बालकांची संख्या झाली. कुपोषणाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा कुठे कमी तर पडत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी पोषण आहार व अमृत आहार योजना राबविली जात आहे. यात ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी कोरोनाचा पूर्वीपासून घरपोच आहार दिला जात होता, तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये आहार शिजवून तो दिला जात होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच २० मार्च २०२०पासून या मुलांनासुद्धा घरपोच आहार देणे सुरू आहे. स्तनदा मातांनासुद्धा घरपोच आहार दिले जात आहे. तीव व अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांसाठी अमृत आहार योजना आहे. या अंतर्गत गर्भवती राहण्यापासून ते प्रसूतीनंतर बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत अंगणवाडीमध्ये दुपारच्यावेळी चौरस आहार दिला जात होता, तर दोन्ही प्रकारातील ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंत असलेल्या बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी किंवा अंडी दिली जात होती; परंतु कोरोना काळात अंगणवाडी सेविकेमार्फत अन्न शिजवून थेट लाभार्थ्यांच्या घरी डबा पोहोचवून दिला जात आहे. असे असतानाही दोन्ही स्वरूपातील बालकांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

-कुपोषणग्रस्तांची संख्या कमी

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८-१९ मध्ये शून्य ते ६ वर्षांपर्यंतची ५९,९८४१ कुपोषणग्रस्त बालकांची नोंद झाली होती. २०१९-२०मध्ये ही संख्या वाढून ६०,०६६८ झाली; परंतु २०२०-२१मध्ये पुन्हा कमी होऊन ५७, ५७४२वर आली.

-अतितीव्रमध्ये ०.१ टक्का, तर तीव्रमध्ये १.४ टक्क्याने वाढ

पूर्व विदर्भात २०१८-१९ मध्ये अतितीव्र ११९८ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ६१६६ (१.० टक्के) बालकांची नोंद झाली. २०१९-२० मध्ये ती कमी होऊन अतितीव्र १४६४ (०.२ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ५५८८ (०.९ टक्के) बालके आढळून आली. मात्र, २०२०-२१ मध्ये त्यात वाढ होऊन अतितीव्र स्वरूपातील १५६९ (०.३ टक्के), तर तीव्र स्वरूपातील ९७०२ (१.७ टक्के) बालकांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अतितीव्र बालकांमध्ये ०.१ टक्का, तर तीव्र बालकांमध्ये १.४ टक्क्याने वाढ झाली.

- १०पट मृत्यूचा धोका अधिक

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या निर्देशकांनुसार तीव्र आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त असलेल्या शून्य ते ५ वयोगटातील बालकांना मृत्यूचा धोका १० पट अधिक असतो. यामुळे या बालकांकडे कोरोना काळातही विशेष लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.

::नागपूूर विभागातील स्थिती

जिल्हा वर्ष अतितीव्र तीव्र कुपोषित बालके

नागपूर २०१८-१९ १२७ ६९३

२०१९-२० २६३ १०५३

२०२०-२१ १०१ ५०४

भंडारा २०१८-१९ १०१ ५४१

२०१९-२० ६५ २४५

२०२०-२१ ७१ ४२५

गोंदिया २०१८-१९ ८४ ५०३

२०१९-२० १५९ ५४२

२०२०-२१ १३४ ६५७

चंद्रपूर २०१८-१९ ८४ ५६७

२०१९-२० १३० ५५५

२०२०-२१ ७७ ४९६

गडचिरोली२०१८-१९ ६१४ २८५३

२०१९-२० ७०९ २५५८

२०२०-२१ १०८० ७१२३

वर्धा २०१८-१९ १८८ १००९

२०१९-२० १३८ ६३५

२०२०-२१ १०६ ४९७