नागपूर : जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी आलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये काही दिवस दमदार हजेरी दिली. पण मागील वर्षीची सरासरी या महिन्यात पूर्ण होऊ शकली नाही. आता वातावरणातील बदलामुळे व्हायरल रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या संकटकाळात पुन्हा नागरिकांना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला. यामुळे ऐन ऑगस्टमध्ये अचानक तापमानात वाढले आहे. ३२ ते ३३ अंश सेल्सिअसवर किमान तापमानाचा पारा असल्याने दमटपणा वाढला आहे. आभाळ असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश नाही. त्यामुळे पिकांवरही किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणाचा आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होत आहे.
आकडेवारी काय सांगते?
महिना - अपेक्षित पाऊस - झालेला पाऊस
जून व जुलै - ४७०.७ - ५१०.१
ऑगस्ट - २०८.७ - ११८.८
...
ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस
यावर्षी ऑगस्टमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला १ ते १६ या तारखेपर्यंत पावसात खंडच होता. या काळातील १० ते १२ दिवस पडलेला पाऊस अडीच मिमीच्या खाली होता. यामुळे या पंधरवाड्यात सरासरी बरीच खालावली. फक्त २५ मिमी पावसाची नोंद या काळात झाली. त्यानंतर आलेल्या पावसाने बॅकलॉग बराच भरून काढला. असे असले तरी सरासरीच्या बराच मागे आहे.
...
३) कोठे किती पाणीसाठा?
प्रकल्प - प्रकल्प संख्या - पाणीसाठा (टक्क्यांत)
लघु प्रकल्प - ६९ - ६२.२१ टक्के
मध्यम प्रकल्प - १८ - ६५.०० टक्के
मोठे प्रकल्प - ५ - ५९.३८ टक्के
...
वातावरण बदलले; काळजी घ्या
वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यू, मलेरिया यासोबतच दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्णही वाढत आहेत. पावसाची उघडीप होत असल्याने सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी शक्यतो पाणी उकळलेले व स्वच्छ प्या. बाहेरचे तसेच उघड्यावरचे खाणे टाळा. संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करा.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल
...