लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांना अधिक जलद गतीने पोहचता यावे यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अलीकडेच केलेल्या एका चाचणीत रेल्वेगाडीने नियोजित अंतर १३० किलोमीटर प्रति तास या गतीने एक तास कमी वेळात कापले.दपूमरेच्या नागपूर विभागातर्फे विविध मार्गांवर गाड्यांचा वेग नेहमीच तपासला जातो. प्रवासी गाड्यांचा वेग वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी रुळांची नियमित देखभाल आणि वेगाची चाचणी घ्यावी लागते. डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात अलीकडेच २४ एलएचबी कोच असलेल्या गाडीच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. नागपूर ते दुर्ग या मार्गावर ही गाडी चालविण्यात आली. यावेळी प्रति तास १३० किलोमीटर या वेगाने ही गाडी यशस्विपणे चालविण्यात आली. यात १ तासाची बचत झाली. एलएचबी प्रकारचे २४ कोच असलेल्या गाडीची ही पहिलीच चाचणी होती. व्ही.के. वर्मा या गाडीचे लोकोपायलट, तर सह लोकोपायलट मो. इलियास होते. गार्ड पी.व्ही. रमन होते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे फक्त विशेष गाड्या धावत आहेत. दपूमरे या लॉकडाऊनचा उपयोग संधी म्हणून करीत आहेत. अलीकडेच शेषनाग ही विशाल मालगाडी नागपूर विभागातर्फे चालविण्यात आली होती. या गाडीची लांबी ३ किलोमीटर होती. असे अनेक प्रयोग दपूमरेच्या नागपूर विभागातर्फे केले जात आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत वाढला गाड्यांचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 8:31 PM
प्रवाशांना अधिक जलद गतीने पोहचता यावे यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अलीकडेच केलेल्या एका चाचणीत रेल्वेगाडीने नियोजित अंतर १३० किलोमीटर प्रति तास या गतीने एक तास कमी वेळात कापले.
ठळक मुद्दे१३० किलोमीटर प्रति तास चाचणी झाली यशस्वी