योगेश पांडेनागपूर : देशातील साक्षरतेचा दर वाढविण्याचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून, महिलांचा शिक्षणाचा टक्कादेखील वाढीस लागला आहे. सद्यस्थितीत देशातील ७९ टक्क्यांहून अधिक महिला साक्षर झालेल्या आहेत. यातील ३६ टक्क्यांहून अधिक महिला या पदवीधारक आहेत. देशातील महिलांची सद्यस्थितीत या विषयावर पुण्यातील दृष्टी या स्वयंसेवी संस्थेतर्फे देशभरात विविध मुद्यांना घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील आकडेवारी ही महिलांच्या शिक्षणात बदल दाखविणारी आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार देशातील महिलांचा साक्षरता दर हा ६४.६ टक्के इतका होता. संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार आठ वर्षांत यात वाढ झाली आहे. साक्षर असलेल्यांपैकी ४६.०५ टक्के महिलांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे, तर १९.२३ टक्के महिला पदवीधारक व १४.२५ टक्के महिला या पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ०.०९ टक्के महिलांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे.सीमाक्षेत्रात साक्षरतेचे प्रमाण कमीदेशाच्या सीमाक्षेत्रातदेखील सर्वेक्षण करण्यात आले. यातील आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमधील २३.८६ टक्के महिला तर पश्चिम बंगालमधील १३.७३ टक्के महिलांनी कधीच शिक्षण घेतलेले नाही.अनुसूचित जातीतील ७० टक्के महिला साक्षर२०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीमधील महिलांची साक्षरतेची टक्केवारी ही ५६.५० टक्के इतकी होती, तर आदिवासी महिलांमधील टक्केवारी ही ४९.३५ टक्के इतकीच होती. देशभरात आदिवासी महिलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र त्यामुळे हवा तसा बदल झाला नसल्याचेदेखील सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांमधील निरक्षरतेची टक्केवारी ३६.५ टक्के, अनुसूचित जातीच्या महिलांची टक्केवारी ३०.३ टक्के इतकी तर विशेष मागास प्रवर्गातील निरक्षर महिलांची टक्केवारी २९.४ टक्के इतकी आहे.३० टक्के महिला शाळापातळीवरच सोडताहेत शिक्षणसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महिलांना शिक्षण घेण्यासाठी अजूनही बराच संघर्ष करावा लागत आहे. प्रामुख्याने कुटुंबातील आर्थिक समस्या व लग्नामुळे महिलांना शिक्षण सोडावे लागते. साक्षर असलेल्यांपैकी ४९.३२ टक्के महिलांनी पदवीच्या अगोदरच शिक्षण सोडले, तर ३०.७६ टक्के महिलांना शाळापातळीवरच शिक्षण सोडावे लागले.महिलांनीच केले महिलांसाठी सर्वेक्षणदृष्टी या संस्थेतर्फे देशभरातील २९ राज्य व ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७४ हजार ९५ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात महिलाच होत्या. देशभरात सुमारे सात हजार महिलांनीच हे सर्वेक्षण केले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.